Adani Wilmar : गेल्या सहा महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करीत असलेल्या अदानी समूहाला पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये अचानक वाढ झाली. मात्र सध्या अदानी समूह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अदानी Adani Wilmar या कंपनीचा वाटा विकण्याचा विचार करीत आहे. अदानी बिल्मर्स ही कंपनी फॉर्च्यून ब्रेड नावाचे खाद्य तेल आणि बाकी खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करते. तर आज जाणून घेऊया अदानी नेमकी कोणाला विकणार आहेत आपली उपकंपनी….
गौतम अदानी आपली उप कंपनी विकणार: (Adani Wilmar)
आपल्यापैकी अनेक जणांनी फॉर्च्यून ओईल हे नाव ऐकलंच असेल, अदानी समूहाचा एक भाग असलेली विल्मर कंपनी या तेलाचे उत्पादन करते. मात्र सध्या गौतम अदानी या कंपनीचा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. ही कंपनी दोन मोठ्या उद्योजकांच्या संयुक्त विद्यमाने काम करते ज्यात दुसऱ्या बाजूला सिंगापूर येथील विल्मर इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. गौतम अदानी आणि विल्मर इंटरनॅशनल या दोघांचाही कंपनीत 43.97% वाटा आहे. अहमदाबाद गुजरात येथे असलेल्या ह्या कंपनीच्या विकण्याची बोलणी सध्या सर्वत्र सुरू आहे. याबद्दल गौतम अदानी यांनी मल्टिनॅशनल कंपन्यांसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे. गौतम अदानी यांच्या कंपनीचे एकूण किंमत 2.5-3 बिलियन डॉलर्सच्या आसपास असू शकते. भारतात एडिबल ऑइलच्या व्यापार करणाऱ्या इतर अनेक कंपन्या आहेत ज्यात सनड्रॉप,नेचर फ्रेश, जेमिनी रिफंड वनस्पती ऑइल यांच्यासारखे मोठमोठी नावे समोर येतात.
आता अदानी समूहाची कंपनी कोण विकत घेणार?
चर्चेत आलेल्या उधाणावरून असं लक्षात येतं की कोलकात्यातील एक कंपनी जे सध्या एडीबल ओईल व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहे. ITC ची एक कंपनी अदानी विल्मर्स यामधला 44% हिस्सा विकत घेण्याचा विचार करत आहे. (Adani Wilmar) ही गौतम अदानी यांची कंपनी असल्यामुळे साहजिकपणे अनेक मोठाल्या कंपन्या यासोबत व्यवहार करण्यात इच्छुक आहेत.ITC ही कंपनी सनफिस्ट, आशीर्वाद आटा आणि जिपी नूडल्सची प्रोड्युसर कंपनी आहे. आणि सध्या त्यांना खाद्यपदार्थांमध्ये स्वतःचा व्यवसाय विस्तृत करण्याची इच्छा असल्यामुळे ते अदानी समूहाच्या कंपनीमध्ये आपली रुची कायम धरून आहेत.