Adani’s Colombo Terminal : चीनची दादागिरी रोखण्यासाठी अदानी आणि अमेरिकेची हातमिळवणी; 55 दशलक्ष डॉलर्सचे बांधकाम सुरु

Adani’s Colombo terminal : गौतम अदानी यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि अदानी यांच्यामध्ये एक करार झालालेला असून या नंतर अदानी समूहाला तब्बल 553 दशलक्ष डॉलर्स देण्यात येणार आहे. हा करार एका बांधकाम प्रकल्पासंबंधित असून हे बांधकाम देशात होणार नाही. या प्रकल्पाची जबाबदारी अदानी समूहावर सोपवण्यात आली आहे पण अमेरिका एवढी मोठी रक्कम कोणासाठी मोजणार आहे? जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा..

Gautam Adani आणि अमेरिकेमध्ये झालाय मोठा करार: Adani’s Colombo terminal

गौतम अदानी आणि अमेरिका यांचामध्ये श्रीलंकेतील राजधानी कोलंबो येथे एक बंदर टर्मिनल (Adani’s Colombo terminal) बांधण्यासंदर्भात बोलणी झाली आहेत. श्रीलंकेत असलेला चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिका या प्रकल्पावर 553 दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यासाठी तयार आहे. आज काळ दक्षित आशियात चीन आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी यशस्वी होत असताना याला आळा घालण्यासाठी हा करार करण्यात आलाय अश्या चर्चा सुरु आहेत.

कोलंबो येथील वेस्ट कंटेनर डेव्हलपमेंट येथे हा प्रकल्प (Adani’s Colombo terminal) उभारला जाणार असून यासाठी लागणारी रक्कम इंटरनेशनल डेव्हलोपमेंट फायनान्स कोर्पोरेशनकडून सर्व प्रकारची आर्थिक मदत पुरवली जाणार आहे. आपण अमेरिकेची आशियात असलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेही याला म्हणू शकतो. गेल्या काही दिवसांपासून चीनचे श्रीलंकेवरील वाढणारे वर्चस्व अमेरिकेसाठी डोके दुखी बनली आहे, गेल्यावर्षी चीन कडून श्रीलंकेत 2.2 अब्ज डॉलर्सची ,मोठी गुंतवणूक केली होती आणि अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे चीन श्रीलंकेला आपल्या कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांची अर्थ व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे.