Agni-5 Missile: संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची मोठी झेप; Agni-5 missile चे यशस्वी परीक्षण

Agni-5 Missile: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मिशन दिव्यास्त्र” ची घोषणा केली आहे. स्वदेशात विकसित ही क्षेपणास्त्र प्रणाली भारताची भू-राजकीय स्थिती मजबूत करेल अशी माहिती माध्यमांना मिळाली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे विकसित अग्नि-5 क्षेपणास्त्राची आज पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली.

प्रगतिशील भारताचे नवीन पाऊल: (Agni-5 Missile)

DRDO ( संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची नवीन क्षेपास्त्र प्रणाली म्हणजे गेम चेंजर म्हणावी लागेल, कारण यात “MIRV” (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) चे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. याचा अर्थ असा की एकाच क्षेपणास्त्रातून आता अनेक स्वतंत्र war heads वेगवेगळ्या ठिकाणांवर मार करू शकणार आहेत. ही नवी घोषणा आपल्या सौरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची आहे कारण, आता आपण एकाच क्षेपणास्त्राने एकापेक्षा जास्त शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करू शकणार आहोत.

स्वदेशी Avionics system आणि अत्याधुनिक Sensor ने सुसज्ज अग्नि-5(Agni-5 Missile) क्षेपणास्त्र जवळपास 5,500 ते 5,800 किलोमीटरवर मारा करू शकणारी ही अत्याधुनिक टेकनॉलॉजी भारताच्या संरक्षणात्मक क्षमतेसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल. विशेषतः पूर्वेकडून येणाऱ्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ही क्षमता अत्यंत महत्वाची ठरणार आहे.