Agriculture Export : गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेने उत्तम कामगिरी बजावली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील भारत प्रगतीच्या मार्गावर कायम राहील अशी अपेक्षा केली जात आहे. आपल्या देशातील परंपरागत व्यवसाय म्हणजेच शेती, अनेक तांत्रिकी बदलल्यानंतर देखील देशातील विविध भागांमध्ये, तिथल्या वातावरणाला अनुसरून शेतीचा व्यवसाय केला जातो. आनंदाची बाब म्हणजे भारतात सध्या शेतीच्या निर्यातीचे प्रमाण वाढत आहे. आत्ताच्या घडीला आपल्या देशातील शेतीच्या निर्यातीने 50 अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे. आपण जर का अशा प्रकारे प्रगती करत राहिलो तरी येणाऱ्या काळात नक्कीच हा आकडा दुप्पट होऊन 100 अब्ज डॉलर्स पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. देशातील शेतीच्या उत्पन्नाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत पोहोचवली जाते. शेतकऱ्यांनी शेतीच्या व्यवसाय धरून ठेवावा, कुठल्याही आर्थिक नुकसानीचा परिणाम त्यांना भोगावा लागू नये म्हणून अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात.
देशात वाढते आहे शेतीची निर्यात:(Agriculture Export)
शेती हा नेहमीच आपला प्राथमिक व्यवसाय राहिला आहे, आणि आत्ताच्या घडीला भारतातून होणारी शेतीची निर्यात ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत होणारे कृषी उत्पादन आणि सेवा यांची निर्यात वाढत आहे. सध्या 50 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठलेली ही निर्यात येणाऱ्या काळात नक्कीच आणखीन प्रगती करेल. त्यांच्या मते सरकारला येत्या सहा वर्षात हा आकडा 100 अब्ज डॉलर्सच्या ही पुढे न्यायचा आहे. वर्ष 2030 पर्यंत शेती उत्पादनाची निर्यात (Agriculture Export) दोन ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचवणे हे केंद्र सरकारचे प्रमुख ध्येय असणार आहे अशी माहिती त्यांनी सादर केली.
इंडस फूडचे उद्घाटन पियुष गोयलांच्या हस्ते:
दक्षिण आशियातील इंडस फुड (Indus Food) 2024 या खाद्यपदार्थांच्या संबंधित कार्यक्रमात बोलताना सुनील बर्थवाल यांनी सांगितले की जगभरातील अनेक देशांना भारतीय उत्पादन आणि सेवा खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यामुळे ही मागणी लक्षात घेऊन सर्वांनी कार्य करत राहावे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हातून झाले. यावेळी पियुष गोयल म्हणाले होते की सध्या देशातील कृषी उत्पादनाची निर्यात 53 अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचली आहे (Agriculture Export). तांदूळ, गहू आणि साखर यांच्या निर्यातीवर काही प्रबंध लागू केलेले असताना देखील या पदार्थांच्या निर्यातीला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे या पदार्थांच्या निर्यातीमध्ये कोणतीही कमी दिसून येणार नाही याची खात्री त्यांनी सर्वांना पटवून दिली होती.
यावेळी बोलताना ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला म्हणाले की, या तीन दिवसीय शोमध्ये सुमारे 90 देशांतील 1200 प्रदर्शक आणि 7500 खरेदीदार सहभागी झाले आहेत. तसेच या शोमध्ये 80 हून अधिक रिटेल कंपन्या सहभागी झाल्या आहेत, ज्यांमध्ये कारफुर,खिमजी रामदास, ग्रेड हायपरमार्केट, नेस्टो, मुसाफा, लुलू आणि स्पार सारख्या मोठ्या नावांचा समावेश होतो.