बिझनेसनामा ऑनलाईन । जगात सगळीकडेच सध्या AI ची जोरदार चर्चा सुरु आहे. नविन तंत्रज्ञानाचे फायदे अनेक आहेत; यामुळे तुमचा वेळ वाचतो, नवीन गोष्टी जाणून घेणं सोपं जातं. नवीन तंत्रामुळे सगळीच कामं सोपी झाली आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीचे जेवढे फायदे तेवढेच तोटे असतात. तसाच काहीसा प्रकार या AI Technology चा आहे. अनेक जणांच्या नोकऱ्या यामुळे धोक्यात आल्या आहेत असे काही लोकाना वाटते पण तरीही मनुष्यबळ कमी लागल्यामुळे भारत AI हब (AI Hub) होण्याची शक्यता आहे.
रिलायंस इंडस्ट्रीज( Reliance Industry) आणि टाटा ग्रुप्स ( Tata Groups) यांच्या सहाकार्याने लवकरच जगातील सर्वात मोठ्या चीप उत्पादक कंपनीने भारताला AI Hub बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली होती. या नवीन प्रकल्पामुळे देशातील तरुण पिढीला कामाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र तर काही जणांना हे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात मनुष्याचे काम हिसकावून घेईल अशी भीती वाटत आहे.
NVIDIA मुळे होणार देशात AI Hub
NVIDIA Lnks ही कंपनी देशात आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती आणणार आहे. त्यांनी टाटा आणि रिलायंस सोबत हातमिळवणी केली आहे. रिलायंस कंपनीकडून सध्या Language Model वर काम सुरु आहे. हे AI तंत्र सहज संवाद साधता यावा, सहज भाष्यंतर करता यावे यासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी लागणारी सामग्री आणण्याची मदत NVIDIA Lnks देणार आहे.
या कंपन्या टाकणार Super Computer ला मागे:
सध्या या दोन्ही कंपन्यांकडून AI वर काम सुरु आहे. रिलायंस AI इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायंस टेलीकॉम युनिट आणि रिलायंस जिओसाठी या तंत्राचा (AI Technology) वापर होणार आहे. या माध्यमातून रिलायंस आणि NVIDIA Inks super computer ला मागे टाकण्याची शक्यता आहे.