Air India Express । विमानप्रवास करायला कुणाला आवडत नाही? भलामोठ्या आकाशातून उडणाऱ्या छोट्याश्या विमानात बसून जावं असं अनेकांचं स्वप्न असत, मात्र आता महागाई एवढी वाढली आहे कि त्यातून डोकं वर करत एवढी मोठी सफर करणं अनेकांसाठी सोपं नाही. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत, ज्यानंतर तुमचा विमान प्रवास अगदीच स्वस्तात होऊ शकतो. ख्रिसमस नाताळ निमित्त Air India आपल्या प्रवाशांसाठी विमान प्रवासादरम्यान ३० टक्के सूट देत आहे.
विमान प्रवास स्वस्त झालायं (Air India Express)
डिसेंबर महिना ओळखला जातो तो म्हणजे नाताळासाठी. आणि आपल्यातलं प्रत्येक लहान मुल सिक्रेट सांताची नकळत वाट पाहायला लागत. सांता म्हटलं कि कदाचित आता तरी मनातली इच्छा पूर्ण होईल अशी आशा वाटत असते. पण नाताळ सुरु व्हायला अजून एक महिन्याचा अवधी बाकी असतानाच एका सिक्रेट सांताने विमान प्रवासाची इच्छा पूर्ण केली आहे, आणि हा सिक्रेट सांता म्हणजे एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express). टाटा समूहाच्या मालकीची हि विमान कंपनी येत्या नाताळात ग्राहकांसाठी विमा प्रवास स्वस्तात उपलब्ध करवून देणार आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपनीने काल म्हणजेच शुक्रवारी आपला नाताळ स्पेशल डिस्काउंट सेल (Christmas Discount Sale) सुरु केला आहे, ज्यानुसार आता विमान तिकिटांवर कंपनी 30 टक्क्यांची सूट देणार आहे. यात देश तसेच विदेशी विमान प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत केलेल्या सर्व बुकिंगसवर हि सूट दिली जाईल मात्र हा प्रवास 2डिसेंबर 2023 ते 30 मे 2024 याच कालखंडात असला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी आपल्या देशात विमान कंपन्यांची परिस्थती फारच बेताची होती, विमान प्रवास महागला होता आणि याचा सामना अनेक प्रवाश्यांनी गेल्या दोन तीन महिन्यांसाठी केला. मात्र आता परिस्थतीत थोडीफार सुधारणा होताना दिसत आहे. एअर इंडिया (Air India Express) जी आधी भारत सरकारच्या मालकीची विमान सेवा होती ती आता टाटा समूहाचा भाग बनल्यानंतर मोठ्या जोमाने विमान सेवेमध्ये सुधारणा करताना दिसत आहे, सध्या हि कंपनी दर दिवसाला 30 देशी आणि 14 विदेशी ठिकाणांना भेट देते.