Air India Express : आता आपल्या वैमानिक क्षेत्रात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी Akasa Air एअर आणि Go First च्या विमान सेवांमध्ये अडचणी आल्यामुळे प्रवाश्यांना तसेच विमानसेवेला काही कठीण परिस्थितींना समोर जावे लागले होते, मात्र आता देशातील विमानांची स्थिती पुहा एकदा सुधारली आहे. अलीकडेच Air India या सरकारी विमानसेवेला टाटा कंपनीला विकत घेतले आहे. कंपनीकडून विमान सेवा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, आता नवीन वैमानिकांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. टाटांची Air India Express 350 नवीन वैमानिकांची नियुक्ती करणार आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस घेतेय नवीन कर्मचारी: Air India Express
आता सगळीकडे जोरात कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे आणि अश्यात एअर इंडिया या विमान कंपनीकडून कर्मचाऱ्यांची केली जाणारी नियुती हि एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. टाटा समूहाच्या मालकीची परवडणाऱ्या दरात सेवा पुरवणारी Air India Express लवकरच 350 पायलट नियुक्त करणार आहे, यामुळे कंपनीच्या वैमानिकांमध्ये वाढ होणार आहे. सध्या 400 वर असलेली हि संख्या येणाऱ्या काळात 900 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
विमान समूहात 70 नवीन विमानांचा समावेश:
एअर इंडिया या विंमानसेवेच्या अंतर्गत असलेल्या चार विमान सेवांमध्ये म्हणजेच एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया यांच्याकडे नवीन विमानं जोडली जाणार आहेत. एकदा का नवीन विमानं रुजू झाली कि नवीन विमानांची संख्या 70 चा पल्ला गाठेल. टाटा समूह सध्या विमानांच्या विलीनीकरणाचा विचार करत असून आगामी काही दिवसांत एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे.