Air India Express Offers : भारतात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेस, आणि विस्तारा या विमान कंपन्यांकडून आनंदाच्या बातम्या दिल्या गेल्या आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या स्पेशल प्रमोशनल कॅम्पे न(Special Promotion Campaign) अंतर्गत आता केवळ 1799 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कॅम्पेनला कंपनीकडून ‘Time To Travel’ असे नाव देण्यात आल्या असून, यामुळे सवलतीच्या दरात विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या अनेकांना फायदा होणार आहे. ही ऑफर 11 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2025 या एक वर्षाच्या कालावधीसाठी वैध असेल. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी एअर इंडिया एक्सप्रेस यासारख्या सुप्रसिद्ध विमान कंपनीने सुरू केलेली सुविधा अनेकांचे लक्ष्य आपल्याकडे आकर्षित करत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या या सवलतीचा वापर करून प्रवासी बेंगलोर ते चेन्नई, दिल्ली ते जयपूर, बेंगलोर ते कोची, दिल्ली ते ग्वालियर आणि कोलकाता ते बागडोग्रा येथे प्रवास करू शकतात. टाटा समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपनीने ही खास ऑफर देऊ केल्यानंतर विस्ताराने देखील कंपनीच्या 9 व्या वर्धापनदिनी एक नवीन ऑफर देण्याचे प्रयोजन केले आहे.
विस्तारा देणार प्रवाशांना खास ऑफर: (Air India Express Offers)
टाटा समूहाची आणखीन एक विमान सेवा कंपनी म्हणजेच विस्तारा एअरलाइन्स. विस्तारा एअरलाइन्स हि अनेक वर्षांपासून बाजारात कार्यरत असून आता लवकरच तिला 9 वर्ष पूर्ण होतील. 9 जानेवारी 2015 पासून विस्तारा ही कंपनी बाजारात सक्रिय आहेत. या कंपनीकडून देशात तसेच विदेशात विमान प्रवासाची सेवा उपलब्ध करून दिली जाते.
कंपनीने ट्विटरचा वापर करून एनिवर्सरी स्पेशल ऑफर (Anniversary Special Offer) ग्राहकांसाठी जाहीर केली. 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2024 कालावधीत विस्ताराची विमान तिकीट बुक केल्यास तुम्हाला 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सवलतीच्या दरात विमान प्रवास करता येणे शक्य आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत विमान प्रवासासाठी तुम्ही 1807 रुपयांमध्ये इकॉनोमि क्लास मधून प्रवास करू शकता, प्रीमियम इकॉनोमी साठी 2309, आणि बिजनेस क्लास मधून प्रवास करायचा असल्यास 9909 रुपये भरावे लागतील (Air India Express Offers). तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इकॉनोमिक क्लास मधून 9999 रुपयांमध्ये विमान प्रवास करणे शक्य आहे याशिवाय बिझनेस क्लास मधून प्रवास करायचा असल्यास 29,999 रुपयांमध्ये प्रवास केला जाऊ शकतो.
एअर इंडिया एक्सप्रेसची स्पेशल ऑफर:
एअर इंडिया एक्सप्रेस कडून न्यू पास रिवॉर्ड प्रोग्राम (NeuPass Rewards Programme) च्या अंतर्गत काही सभासदांना मोफत दरात प्रायोरिटी सर्विसेस दिल्या जातील. ही सुविधा फक्त Highflyer आणि Jet center मधल्या समूहासाठी उपलब्ध आहे. अशा सदस्यांना एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणार्या विशेष कार्यक्रमाद्वारे 8 टक्के नवीन नाणी देखील मिळतील. यासोबतच जेवण, सीटची निवड, विमान तिकीट रद्द करणे, सामानाचे नियम इत्यादींवर अनेक विशेष सवलतींचा लाभ दिला जाईल.