Air India Flights To Ayodhya: एअर इंडिया एक्सप्रेस ‘या’ 3 शहरांमधून अयोध्येसाठी करणार थेट उड्डाण

Air India Flights To Ayodhya: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या नगरीत नवीन विमानतळाचे उदघाटन करण्यात आले. सध्या अयोध्या नवीन श्रीराम मंदिर निर्मानामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. मात्र मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी आज संपन्न झालेला उदघाटन सोहळा हा देखील अयोध्येच्या प्रतिष्ठेला साजेसा ठरला. नवीन विमानतळा बरोबरच अयोध्येत पुनर्विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचा देखील श्रीगणेश केला. दरम्यान पंतप्रधानांच्या हातून सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस आणि भगव्या रंगाच्या नवख्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अयोध्या हे मंदिर निर्माणानंतर भक्त परिवार तसेच पर्यटकांसाठी आकर्षक केंद्रबिंदू ठरणार आहे. अनेक दिवसांपासून लढा दिल्यानंतर उभारलेले मंदिर पाहण्यासाठी लाखो आणि करोडोंच्या संख्येने भाविक अयोध्येकडे वळतील म्हणूनच त्यांची प्रवासाची गैरसोय रोखण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. आता अयोध्या नगरीसाठी वाढलेली मागणी पाहता एअर इंडिया कंपनीने देशातील प्रमुख तीन शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाची विमानसेवा अयोध्येत सुरु: (Air India Flights To Ayodhya)

आजचा दिवस अयोध्येच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस म्हणून कायम जपला जाईल. आज, म्हणजेच शनिवारी 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12:15 वाजता अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच रेल्वे स्थानकाचे उघटन करण्यात आले. जगभरात धार्मिक ग्रंथ म्हणून विशेष स्थान प्राप्त असलेल्या रामायणाचे राचेते महर्षी वाल्मिकी यांचे नाव नवीन विमानतळाला देण्यात आले आहे. या नवख्या विमानतळावर एअर इंडियाकडून विमान सेवा पुरवली जाईल. कालच एअर इंडिया एक्स्प्रेसकडून देशातील तीन विविध क्षेत्रांमधून अयोध्येकडे विमान प्रस्थान केले जाण्याची घोषणा करण्यात आली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आज दिल्ली मधून एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान अयोध्येकडे उड्डाण करेल तसेच 17 जानेवारी रोजी कलकत्ता आणि बंगलोरमधून एअर इंडियाची विमानं अयोध्येकडे (Air India Flights To Ayodhya) झेप घेतील.

एअर इंडियाची विमान सेवा कशी असेल?

बंगलोरमधून अयोध्येसाठी उड्डाण घेणारं विमान 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:05 वाजता पहिली झेप घेईल जे कि 10:15 वाजता अयोध्येत वाल्मिकी आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करणार आहे, पुन्हा एकदा अयोध्या ते बंगलोर प्रवास करण्यासाठी 3:40 ते 6:10 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. केवळ बंगलोरच नाही तर १७ तारखेला कोलकात्यावरून एअर इंडीआयचे विमान ठीक 1:25 वाजता उड्डाण घेतलेलं विमान अयोध्येत 3:10 वाजता प्रवेश करेल, याआधी सकाळी 11:05 वाजता अयोध्येतून निघालेलं विमान 12:50 वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचेल, एअर इंडियाकडून पुरवली जाणारी हि थेट विमानसेवा असणार आहे(Air India Flights To Ayodhya).

एअर इंडिया या विमान कंपनीचे चीफ कमर्शियल ऑफिसर अंकुर गर्ग म्हणतात कि एअर इंडिया हि विमान कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न करत आली आहे, आणि यापुढे देखील नेहमीच ग्राहकांचा प्रवास सुखकर कारण हेच त्यांचं अंतिम ध्येय असणार आहे. अयोध्येत सध्या चाललेली गडबड आणि प्रवासाची वाढती मागणी पाहता पर्यटकांचा प्रवास सोयीस्कर बनवण्यासाठी कंपनीने सध्या देशातील प्रमुख तीन शहरांमधून विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन प्रमुख शहरांमध्ये बंगलोर, दिल्ली आणि कलकत्ता यांचा समावेश होतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारी 2024 पासून एअर इंडियाच्या अयोध्या आंतराष्ट्रीय विमानतळावर कमर्शियल सर्व्हिसिस सुरु होतील.