Air India Flights : इस्रायल आणि हमास यांच्या कैक दिवसांपासून युद्ध सुरु आहे आणि ते काही एवढ्यात संपायच्या मार्गावर नाही. पण आधी देखील म्हटल्याप्रमाणे युद्धाचा परिणाम केवळ तिथे राहणाऱ्या रहिवाश्यांवर होत नसून जगातील इतर देशांवरही होत आहे, अश्या परिस्थितीत भारत काही अपवाद राहणार नाही. त्यामुळे काही टक्के परिणाम हा आपल्यालाही भोगावा लागणार आहे, आता भारतातून इस्रायेलला जाणाऱ्या Air Indiaच्या विमान सेवेबद्दल एक मोठी बातमी समोर बातमी समोर आली आहे. ती आता थोडक्यात जाणून घेऊया..
एअर इंडियाने स्थगित केली विमान सेवा: Air India Flights
इस्रायल आणि हमास यांच्यातील स्थिति सुधारण्याएवजी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याबाबत दररोज नवीन बातम्या समोर येताच असतात आणि आता एअर इंडियाकडून नवीन अपडेट देण्यात आला आहे. टाटा समूहाच्या अनातर्गत येणारी विमान कंपनी म्हणजे एअर इंडियाने तेल अवीवसाठी नियोजित फ्लाइट्सवरील बंदी 2 नोव्हेंबरपर्यंत वाढवली (Air India Flights)आहे. कंपनीने 7 ऑक्टोबर पासून तेल अवीव इथे जाणारी आणि परतीच्या उड्डाणावर बंदी घातली होती, जिची मुदत आता वाढवण्यात आली आहे.
भारतात आणि तेल अवीव मध्ये किती उड्डाणे होतात:
अंदाजे भारतातून अवावीसाठी आठवड्यातून किमान 5 विमान उड्डाणे होतात. कंपनीकडून आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी या दिवशी विमानसेवा पुरवल्या जातात. मात्र आता कंपनीने म्हटल्याप्रमाणे इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठीच गरजेनुसार विमानसेवा चालवल्या जातील. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन अजय सुरु केले गेले आहे, ज्यात एअर इंडिया या विमान सेवेचा सक्रीय सहभाग आहे. आजपर्यंत एअर इंडियाने उड्डाणे करून भारतीयांना परत देशात आणले आहे.