Air India च्या ताफ्यात 400 नवीन विमानांचा समावेश होणार

Air India : देशाच्या विमान सेवेची परिस्थिती काही दिवसांपूर्वी खूपच बिकट झाली होती. आणि एका मागून एक विमान कंपन्या संकटांचा सामना करत होत्या. यामुळे काय झालं तर विमानसेवेचा तुडवडा जाणवायला सुरुवात झाली. प्रवाश्यांनी महाग तिकिटांचा सामना केला, तो काळही असा होता जिथे प्रवास करण्यावाचून काही पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता पुन्हा एकदा विमानसेवेसाठी अच्छे दिन सुरु झालेत असं म्हटलं जाऊ शकतं. सध्या एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आहे आणि त्यांनी आपल्या सेवेत नवीन विमानांचा समावेश केला आहे.

एअर इंडियामध्ये नवीन विमानांचा समावेश : Air India

अगोदर Air India हि कंपनी भारत सरकारच्या मालकीची होती जी आता टाटा समूहाकडे सोपवण्यात आली आहे. टाटा समूह कंपनीला नवीन पल्ला गाठायला मदत करताना दिसतो. आता एअर इंडियाने आपल्या विमान सेवेत नवीन विमानांचा समावेश केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीकडून हे पाऊल उचलले जाणायची शक्यता असल्याची वार्ता ऐकायला मिळत होती, जी आता खरी ठरली आहे.

किती नवीन विमाने आणणार –

देशातील आणि देशाबाहेर उड्डाण करणाऱ्या विमानांमध्ये आता 400 नवीन विमानांचा समावेश केला जाणार आहे. हि सेवा मार्च 2024 पासून सुरु होण्याचे संकेत कंपनीकडून मिळाले आहेत. देशातील प्रवाश्यांना अधिक चांगली सेवा देता यावी म्हणून पुढच्या सहा महिन्यांत नवीन 200 विमानांचा समावेश करण्यात येणार आहे.आणि यानंतर दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधला प्रवास सोपा होईल असे कंपनी म्हणाली. आंतरराष्ट्रीय सेवा देखील जोमाने सुरु असून इथे 200 नवीन विमानं जोडली जाणार आहेत, ज्यांपैकी 80 विमानं आपल्या सेवेत रुजू झाली आहेत.