बिझनेसनामा ऑनलाईन । सरकारी अखत्यारीखाली येणारी Air India हि विमान सेवा सध्या टाटा समूहाचा भाग बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील विमान सेवा ठप्प झाली होती, आणि तेव्हापासून प्रवाश्यांना महाग तिकिटांचा वापर करण्यावाचून पर्याय उपलब्ध नव्हता. हळू हळू देशात विमान सेवा सुधारत आहे. एअर इंडियाने देखील अलीकडेच 400 नवीन विमानांचा आपल्या कंपनीमध्ये सहभाग करून घेत कंपनीला उच्य स्तरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता टाटा समूहासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या विमान सेवेला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. असं का हे आज जाणून घेऊया…
एअर इंडियाला का ठोठावला दंड : Air India
DGCF कडून एअर इंडियाच्या नावे दंड ठोठावण्यात आला आहे. आणि हि रक्कम साधी सोपी नसून तब्बल 10 लाख रुपयांची आहे. या बरोबरच विमान सेवे निगडीत नियमांच्या अनुसार आता कंपनीच्या नावे कारणे द्या नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. हि नोटीस का जारी करण्यात आली तर प्रवाश्यांच्या बाबतीत दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये कंपनीकडून काही तरी खोट आढळून आला होता. कंपनीला दंड भरावा लागण्याची ही पहिली खेप नाही, या आधी देखील प्रवाशांच्या बोर्डिंग प्रक्रीये संबंधित काही तरी त्रुटी आढळून आल्यामुळे (CAR चे उल्लंघन) गेल्या वर्षी सुद्धा 10 लाख रुपयांचा दंड भरणे कंपनीला क्रमप्राप्त झाले होते. आता लवकरात लवकर Air India ला त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल उत्तर द्यावे लागणार आहे व सोबतच दंडही भरावा लागणार आहे.
या व्यतिरिक्त Air India विमान सेवेबद्दल अजून एक महत्वाची बातमी समोर आली ज्यात असे नमूद केले गेले आहे कि कंपनीच्या एक वरिष्ठ वैमानिकाकडून DGCA कडे कंपनी बाबत एक तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये असे नमूद केले गेले आहे कि इमर्जन्सी ऑक्सिजनच्या सोयी शिवायच इथे आंतराष्ट्रीय उड्डाण करण्यात आले होते. Air India हि देशातील एक विश्वासू आणि प्रवाश्यांना परवडणाऱ्या विमान सेवांपैकी एक आहे, त्यामुळे एका मागोमाग एक अश्या चर्चा नक्कीच या विमान सेवेसाठी अडथळा निर्माण करतील का अशी भीती निर्माण झाली आहे.