Air India ने दिली 470 नवीन विमानांची ऑर्डर; प्रवाशांची गैरसोय होणार नाही

Air India : भारतीय विमान सेवा सध्या सुधारण्याच्या मार्गावर आहे. आणि यात सर्वात मोठा वाटा जर का कुणाचा असेल तर तो आहे एअर इंडियाचा. काही काळापूर्वी हि कंपनी भारत सरकारच्या अखत्यारीखाली होती पण आता कंपनीची जबाबदारी टाटा समूहाच्या खांद्यावर देण्यात आली आहे आणि टाटा समूह हि जबाबदारी अत्यंत उत्तम रित्या पार पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं कि एअर इंडिया हि विमान सेवा काही नवीन विमानं कंपनीमध्ये सामील करू पाहत आहे, आणि आता याच संदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे ती काय हे जाणून घेऊया…

ग्राहकांसाठी काम करणारी Air India :

टाटा समूहाचा भाग असलेली एअर इंडिया या विमान सेवेचे CEO कैंपबेल विल्सन यांनी एक नवीन माहिती जगासमोर आणली. विल्सन म्हणाले कि एअर इंडियाच्या अनेक ग्राहकांना विश्वासू आणि वेळ पाहणारी सेवा अपेक्षित आहे, आणि ग्राहकांना पहिलं प्राधान्य देत कंपनीने एक नवीन निर्णय जारी केला आहे. ग्राहकांना गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास नेहमीच सुखाचा व्हावा म्हणून कंपनीकडून 470 नवीन विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. पुढच्या अठरा महिन्यात म्हणजेच साधारण एक दीड वर्षात प्रत्येक आठवड्यात कंपनीजवळ एक नवीन विमान असेल. आणि कंपनी लगेचच त्यांना ग्राहकांच्या सेवेत रुजू करेल.

कंपनीत नवीन विमानं जोडण्यासोबतच ते नवीन कृ आणि कर्मचारी वर्गाच्या नियुक्तीचा विचार करीत आहेत. आपल्या विमान सेवेत कोणतीही कसर बाकी राहणार नाही याची पूर्ण खबरदार एअर इंडिया विमान सेवेकडून (Air India) घेतली जात आहे. या शिवाय कंपनी लवकरात लवकर बंद असलेल्या विमानांची दुरुस्ती करून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण करण्या इतपत त्यांना सक्षम बनवणार आहे. भारताची विमान सेवा अजूनही सुधार करण्याचे प्रयत्न करत आहे आणि ग्राहकांच्या गरजा वाढत असल्यामुळे वर्ष 2019 च्या तुलनेत विमान सेवांना 20 टक्के मागणी अधिक आहे, प्रवाशांची होणारी हीच गैरसोय ओळखून एअर इंडियाने नवीन पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला.