Air India : राज्य सरकारने विकत घेतली Air India ची नरीमन पॉईंट जवळील इमारत

बिझनेसनामा ऑनलाईन : तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र सरकारने Air India ची पूर्ण इमारतच विकत घेतलेली आहे. हो!! नरीमन पॉईंट जवळील एअर इंडियाची इमारत आता राज्य सरकारच्या ताब्यात आहे. सरकारचा विचार या इमारतीचे रुपांतर एका मंत्रालयामध्ये करायचा असल्यामुळे हि पूर्ण इमारत विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. AI ऑसेट होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडून सरकारने तब्बल 1,600 कोटी रुपयांना हि इमारत विकत घेऊन करार पूर्ण केला होता.

गेल्या वर्षापासून खटाटोप सुरु: Air India

हा निर्णय काही एका दिवसांत किंवा काही महिन्यांत घेतला गेलेला नाही. यासाठी राज्य सरकार गेल्या वर्षीपासून प्रयत्न करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे प्रयत्न सुरूच होते त्यानंतर राज्यातील महाविकास सरकार अंतर्गत 2021 पासून या प्रस्तावाबद्दल चर्चा पुन्हा सुरु झाली. परंतु अंतिम असा कोणताही करार त्यावेळी झाला नाही.

1993 मध्ये दहशदवादी हल्ल्याचा या इमारतीवर वाईट परिणाम झाला होता व त्यानंतर 2018 मध्ये एअर इंडिया कंपनीकडून हि 23 माजली इमारत विकण्याचा विचार सुरु केला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी इमारत विकत घेण्याबाबत इच्छा हि व्यक्त केली होती. हि इमारत विकत घेण्याचा एकमेव उद्देश म्हणजे मंत्रालयाचे काम एका छताखाली आणणे असा आहे. कंपनीकडून राज्य सरकार समोर 2000 कोटी रुपयांचा सौदा ठेवण्यात आला होता मात्र सरकारला एअर इंडिया (Air India) कंपनीकडून 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची गरज असल्यामुळे शेवटी हि इमारत 1,600 कोटी रुपयांत सरकार जमा झाली.