बिझनेसनामा ऑनलाईन । विमान प्रवास कुणाला करायला आवडत नाही.? त्यात जर का तो प्रवास विदेशात करायचा असेल तर उत्साहाच वेगळा असतो. आता जी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत ती वाचून असं स्वप्नं बाळगणाऱ्या अनेक लोकांना आनंद होणार आहे. एअर इंडिया (Air India) हे नाव तर तुम्ही ऐकलच असेल, हि भारत सरकार कडून चालवली जाणारी विमान सेवा आहे आणि आता या विमान सेवेकडून अमेरिकेच्या प्रवासासाठी तुम्हाला विशेष सवलती देऊ केल्या जाणार आहेत. त्यामाध्यमातून फक्त ४३ हजारांमध्ये तुम्ही अमेरिकेची सफर करू शकता.
Air India ची मोठी घोषणा:
विमान प्रवास आणि परदेशी जाण्याचं स्वप्न एकदमच पूर्ण होण्याची हि एक आकर्षक संधी आहे. एअर इंडिया अमेरिकेच्या प्रवासात काही विशेष सुट देऊ करणार आहे. अमेरिकेत एकेरी प्रवास करण्यासाठी 43 हजार रुपयांपासून तिकिटांची विक्री केली जाणार असून या तिकिटांची विक्री 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या मर्यादित काळापर्यंतच केली जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेत एकेरी प्रवास करायचा असल्यास तिकीटाची किंमत 42,999 रुपये अशी असेल, तर परतीचा प्रवास करण्यासाठी तिकीटाची रक्कम हि 52,999 रुपये अशी ठरवण्यात आली आहे, याशिवाय जर का तुम्ही इतर ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर ईकोनोमी क्लासच्या सिंगल प्रवासाची किंमत 79,999 रुपये अशी रक्कम आकारली जाईल, तर हीच रक्कम वाढून परतीच्या प्रवासासाठी 1,09,999 अशी असेल
सध्या हि सेवा कुठल्या ठिकाणी सुरु आहे?
भारतात दिल्ली, मुंबई व बंगलोर या प्रमुख शहरांमधून अमेरिकेसाठी आठवड्याला 47 विमानं(Air India) उड्डाण करत असतात. परदेशात गेल्यानंतर न्यूयॉर्क, न्यू जर्सी , वाशिंग्टन डीसी , शिकागो , सेन फ्रास्न्सिस्को या अमेरिकेतील पाच प्रमुख स्थानांपर्यंत हा प्रवास करता येतो. जर का तुम्ही परदेशी विमान प्रवासासाठी इच्छुक असाल तर या सवलतीचा फायदा नक्कीच करून घ्यावा, कारण एवढ्या कमी पैश्यात अमेरिका सारख्या देशात प्रवास कारण सोपी गोष्ट मुळीच नाही. संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही एअर इंडियाच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता, तसेच तिकीटाची सोय देखील इथून होऊन जाईल.