Airport In Lakshadweep : मालदीव विरुद्ध मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; म‍िनीकॉयमध्ये उभं राहणार नवीन विमानतळ

Airport In Lakshadweep : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काही दिवसांत लक्षद्वीपला भेट दिल्याने अनेकांच्या मनात या जागेबद्दल कुठूहल निर्माण झाले आहे. त्यांच्या या भेटीनंतर मालदीव आणि भारत यांच्यामध्ये सुरू असलेल्या सोशल मीडियावरच्या संघर्षामुळे तर लक्षद्वीप बद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता लक्षद्वीपला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढत जाईल व म्हणूनच भारत सरकारकडून याबाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. इथे येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना विमानसेवेची सोय उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकार तर्फे लक्षद्वीप वर नवीन विमानतळाची निर्मिती केली जाईल. इथे केवळ नागरिकी विमानंच नाही तर सैन्याच्या विमानांना देखील उतरण्याची परवानगी दिली जाणार आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार हे नवीन विमानतळ मिनीकॉय येथे बनवण्यात येईल. बॉयकट मालदीव (Boycott Maldives) हा ट्रेंड सोशल मीडियावर बराच वायरल झाला, व परिणामी अनेकांनी लक्षद्वीपकडे आपल्या नजरा वळवल्या. आता सध्या तर भारतीयांनी चलो लक्षद्वीप (Chalo Lakshadwee) हा नवीन ट्रेंड सुरू केला असून यामुळे सर्व प्रकरणाला अधिक चालना मिळाली आहे आणि म्हणूनच जगभरातून विविध पर्यटकांच्या रंगा लक्षद्वीपकडे लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिनीयॉक बेटावर सुरू होणार नवीन विमानतळ: (Airport In Lakshadweep)

मिनीयॉक या बेटावर नवीन एअरफील्ड तयार करावे असा प्रस्ताव सरकार समोर ठेवण्यात आला होता. आणि सरकारकडून या प्रस्तावाला संमती मिळाली आहे. या नवीन एअरफील्डचा वापर करून आता अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या क्षेत्रांवर नजर ठेवण्यात येईल. भारतीय सेनेसाठी हा एकार्थाने बेज म्हणून तयार करण्यात येणार आहे. सध्या समुद्री मार्गाने अनेक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने देशाच्या सुरक्षेतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा सदर प्रस्ताव इंडियन कोस्ट गार्ड यांच्यातर्फे सरकार समोर ठेवण्यात आला होता. आता प्रस्तावाच्या अनुसार भारतीय वायुसेना मिनीकॉय येथे सुरू होणाऱ्या ऑपरेशनचे नेतृत्व करेल. या विमानतळाची निर्मिती पूर्ण झाल्याने भारतीय सेनेला अरबी समुद्रातून आजूबाजूच्या क्षेत्रावर नजर ठेवण्याचे संधी मिळेल, आणि म्हणूनच खास करून सरकारने या प्रस्तावाला (Airport In Lakshadweep) मंजुरी दिली आहे. शिवाय सध्या लक्षद्वीप बद्दल वाढणारे जगभरातील आकर्षण लक्षात घेता इथे पर्यटकांचे रांग वाढत जाईल. पर्यटन क्षेत्रातून देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक फायदा व्हावा म्हणून या नवीन विमानतळाची निर्मिती केली जाईल.

सध्या लक्षद्वीपवर कार्यरत विमानतळ कोणते?

आत्ताच्या घडीला केंद्रशासित प्रदेशात अगट्टी (AGX) येथे एक हवाई पट्टी आहे. मात्र त्यावर फक्त नॅरो बॉडी विमानेच उतरू शकतात. नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव आणि सध्याच्या सुविधांचा विस्तार करण्याचा प्रस्ताव पुन्हा सुरू झाल्याने येणाऱ्या काळात लक्षद्वीपचे चित्रच पालटेल. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीप हे चर्चेचे आणि आकर्षणाचे केंद्र बनले आहे. प्रधानमंत्री मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर तो बऱ्याच प्रमाणात प्रसिद्धी झोतात आलाय आणि येथे भेट देण्यात इच्छुक असलेल्या लोकांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.