Airport Lounge Access : Credit Card च्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी; विमान प्रवासात मिळणार मोठा फायदा

Airport Lounge Access | आपण सगळेच क्रेडिट कार्डचा वापर करतो, क्रेडिट कार्डचा वापरामुळे माणसाचं जीवन अनेक अर्थाने सोपं झालेलं आहे. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हातात पैसे घेऊन फिरण्याचे गरज राहिलेली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का क्रेडिट कार्डचा हा एकच फायदा नसून अनेक फायदे आहेत ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. याच अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे क्रेडिट कार्डच्या वापरावर मिळणारा Airport Lounge Access. जाणून घेऊया नेमक्या कोणत्या क्रेडिट कार्डचा वापराने आणि कशाप्रकारे हा एक्सेस मिळवला जाऊ शकतो….

क्रेडिट कार्डचा वापर विमानतळावर: (Airport Lounge Access)

आपल्या देशात अशा अनेक क्रेडिट कार्डच्या कंपन्या आहेत ज्या विमानतळावर विमान सेवांचा लाभ घेण्यास मदत करतात, यातील एक सुविधा म्हणजे Airport Lounge Access. विमानतळांवरून आलेल्या आकड्यांच्या अनुसार आजकाल अनेक मंडळी या सुविधांचा वापर करताना दिसतात तसेच वेळोवेळी अश्या वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज जाणून घेऊया नेमक्या कोणत्या बँका हि सुविधा उपलब्ध करवून देतात.

SBI चे कार्ड वापरून कशी मिळवाल सुविधा:

देशातील सुपरहिट बँक म्हणजेच SBI, तुम्ही जर का SBI चे वापरकरते असाल तर ही बँक आपल्या ग्राहकांना मोफत Airport Lounge सुविधा उपलब्ध करून देत आहे. यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डवर दरवर्षी 4,499 रुपये असे शुल्क फी म्हणून भरावे लागेल. तरच तुम्ही देशात तसेच विदेशात प्रवास करताना मोफत Airport Lounge Access सुविधेचा वापर करू शकता. इथे तुम्हाला खाद्यपदार्थ आणि डिपार्टमेंट स्टोअरवर काही आकर्षक बक्षीस हि दिली जातील तसेच 6000 रुपयांचे सिनेमाचे तिकीट सुद्धा मिळून जाईल.

आणि जर का तुम्ही स्टेट बँकचे प्राईम क्रेडिट कार्ड वापरत असाल तर दर वर्षी 299 रुपये भरल्यानंतर पुढच्या एक वर्षापर्यंत 3 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येतो. इथे तुम्हाला Airport Loungeची सुविधा तर मिळेलच पण याशिवाय गिफ्ट वॉचर, बोनस रिवॉर्ड पॉइंट अशा अनेक सुविधांचा लाभ घ्यायला मदत मिळेल.

आणि इतर बँकांचे ग्राहक असू तर?

इतर कोणत्या बँका देतायेत ही सवलत? स्टेट बँक प्रमाणेच HDFC आणि एक्सिस बँक आपल्या ग्राहकांना Airport Loungeच्या सुविधा देत आहे. HDFC बँकेचे ग्राहक असाल तर या सर्वात आधी HDFC डायनर्स क्लब प्रेविलेज क्रेडिट कार्ड मिळवावे, या कार्डवर वार्षिक 2500 रुपये शुल्क म्हणून भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही अमेझॉन प्राईम, टाइम्स प्राईम टाईम यांसारखी सबस्क्रीप्शन्स मिळवू शकता.Axis Bank सुद्धा या शर्यतीत मागे नाही, एक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही दरवर्षी 3000 रुपये भरून Airport Lounge सोबतच बिग बास्केट, स्विगी इथून केलेल्या मोठ्या प्रमाणात सूट मिळवू शकता.