Airtel Recharge Plan : Airtel चा ‘हा’ स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन तुम्हाला देईल वर्षभराचा आनंद

Airtel Recharge Plan: जिओ(Jio) वोडाफोन-आयडिया(Vi) यांसारख्या अनेक मोठाल्या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध करून देत असतात. आणि या शर्यतीत एअरटेल (Airtel) ही कंपनी सुद्धा मागे नाही, देशभरात Airtel च्या ग्राहकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. इतर टेलिकॉम कंपन्याप्रमाणेच एअरटेलने सुद्धा आता फायदेशीर सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देत, त्यांचा मार्ग अजून सोयीस्कर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तुम्ही जर का Airtel चे वापरकर्ते असाल आणि काही खास आणि स्वस्त अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा…

हा आहे एअरटेलचा वर्षभरासाठी सर्वात स्वस्त प्लॅन: (Airtel Recharge Plan)

तुम्ही एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटला जर का भेट दिलीत तर यावर रिचार्ज प्लॅन्सचे अनेक पर्याय पाहायला मिळतील. घरून काम करणाऱ्या लोकांची संख्या आता वाढल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त इंटरनेटची गरज असते, अनेकांच्या घरी आजही WiFi कनेक्शन नसल्यामुळे ते अधिकांश प्रमाणात मोबाईलच्या इंटरनेटवर अवलंबून आहेत. म्हणूनच टेलिकॉम कंपन्या या ग्राहकांना मदत पुरवण्यासाठी काही विशेष प्लॅन्स तयार करीत असतात. शिवाय मोबाईलचा वापर हा कॉलिंगसाठी बनला गेला आहे, जुन्या काळात जेवढा कॉल लांबणीवर जायचा, त्यावर तेवढेच अधिक पैसे कापले जायचे. मात्र हीच गैरसोय लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्यांनी आता अनलिमिटेड सेवा अमलात आणली आहे.

आज आम्ही एअरटेलचा अशा प्लॅन बद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत जो तुम्हाला कॉलिंग,डेटा तसेच इतर अनेक फायद्यांमधून मदत पोहोचवेल (Airtel Recharge Plan). सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनची व्हॅलिडीटी इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 1799 रुपयात मिळणारा हा रिचार्ज प्लॅन तुम्हाला 24GB डेटा पुरवतो, शिवाय वापरकर्त्याला इथे अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेही मिळतात. हा प्लॅन पूर्ण एक वर्षासाठी वैध असल्यामुळे ग्राहकांना पुन्हा-पुन्हा रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. तसेच या प्लॅन अंतर्गत 3600 SMS वर्षभर पाठवता येतात.

मात्र लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये तुमच्या इंटरनेटची सेवा ही पूर्ण एका वर्षासाठी मर्यादित केली गेली आहे, त्यामुळे अतिरिक्त डेटा हवा असेल तर तुम्हाला वेळोवेळी वेगळा रिचार्ज करावा लागेल. इंटरनेटच्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन(Airtel Recharge Plan) बनलेला नसून केवळ कॉलिंगसाठी मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी बनवाला गेला आहे. ज्या ग्राहकांना कमीत-कमी किमतीत जास्त व्हॅलिडीटीसह कॉलिंगचा फायदा देणारा मोबाईल रिचार्ज हवा आहे त्यांनी नक्कीच एअरटेलच्या या प्लॅनची निवड करावी.