Airtel Unlimited 5G Rules : देशात सध्या 5G मोबाईल सेवा सुरु झाल्या आहेत. अनेक ग्राहक परिणामी 4G चा वापर सोडून नवीन बदलांकडे वळत आहेत. Jio आणि Vodafone (VI) प्रमाणेच Airtel कंपनीने देखील त्यांच्या ग्राहकांसाठी 5G सेवा सुरु केल्या आहेत. मात्र आता भारती एअरटेल कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी काही नियम व अटी बनवण्यात आल्या आहेत, आणि कंपनीकडून बनवल्या गेलेल्या या नियमाचे पालन करणे प्रत्येक ग्राहकांसाठी अनिवार्य आहे. तुम्ही जर का एअरटेल कंपनीचे ग्राहक असाल तर हि बातमी नक्की वाचा.
काय आहेत एअरटेलचे नवीन नियम: (Airtel Unlimited 5G Rules)
काही दिवसांपूर्वीच टेलिकॉम रेग्युलेटर ऍथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) कडून Jio आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सर्व्हिस पॉलिसीजचे नियम स्पष्ट शब्दांत मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर एअरटेल या कंपनीने ग्राहकांसाठी बनवलेल्या आपल्या नियम व अटींची मांडणी सर्वांसमोर केली आहे. कंपनीच्या 5G सर्व्हिसिस (Airtel Unlimited 5G Rules) बद्दल बोलताना ते सांगतात कि अनलिमिटेड डेटा हा वापरकर्त्यांना कॉम्प्लिमेंटरी बेनेफिट म्हणून देण्यात आला आहे मात्र यासोबत त्यांना काही अटींचे पालन करावे लागेल. कंपनी कडून दिल्या जाणाऱ्या या सेवा फक्त खासगी वापर आणि नॉन कॉमेर्शियल वापरासाठीच असणार आहे. व्यावसायिक कामांसाठी कंपनी त्यांच्या सेवा उपलब्ध करून देणार नाही. कंपनीने यासाठी दर महिन्याला 300GB ची मर्यादा (Airtel Unlimited 5G Rules) लागू केली आहे आणि यापेक्षा अधिक डेटाचा वापर हा आपोआपच कमर्शिअल वापर समजला जाईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एअरटेलचे रिचार्ज प्लॅन्स जे 239 रुपयांपासून सुरु होतात त्यांवर अनलिमिटेड डेटाची सुविधा लागू होते .कंपनीच्या माहितीनुसार इथे मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रीपेड प्लॅन्सवर तुम्हाला अनलिमिटेड 5G सर्व्हिसिसचा वापर करता येणार आहे. कंपनीकडून वर्ष 2020 मध्ये हि सेवा सुरु करण्यात आली होती.
Vi ने केली होती तक्रार:
टेलिकॉम रेग्युलेटर ऍथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) कडून Jio आणि Airtelला स्पष्टीकरण द्या असे सांगण्याचे कारण आहे Vi . या कंपनीने अधिकाऱ्यांकडे Jioआणि एरटेल विरुद्ध तक्रार नोंदवली होती कि या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या 5G सर्व्हिसिसची किंमत ठरवली पाहिजे. म्हणूनच आता एरटेल कंपनीने त्यांच्या 5G सेवांबद्दल माहिती सादर केली आहे.