Akasa Air: केंद्रीय वित्त मंत्रालयाने 1956 च्या मध्यवर्ती विक्री कर अधिनियमाच्या कलम 5 च्या उप-कलम (5) अंतर्गत अधिकार वापरून Akasa Airlines (SNV Aviation Private Limited) ला ‘मान्यताप्राप्त भारतीय वाहतूकदार’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांसाठी त्यांना आता विशेष सोयी आणि सवलती मिळणार आहेत.
अवघ्या 19 महिन्यांत घेणार परदेशी भरारी: (Akasa Air)
भारतात विमान सेवा सुरु कल्यानंतर अवघ्या 19 महिन्यांतच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणारी ही पहिली स्वस्त विमानसेवा ठरली आहे. त्यांची पहिली विमानसेवा 7 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरू झाली होती. आता 28 मार्चपासून आकासा एअर मुंबई ते दोहा अशी थेट विमानसेवा सुरू करणार आहे, यामुळे भारतातून कतारला जाण्या-येण्यासाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि प्रवासाचा खर्चही कमी होण्याची शक्यता बाळगली जाऊ शकते.
भारताच्या विमान नियमाप्रमाणे, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एखाद्या विमान कंपनीकडे कमीत कमी 20 विमाने असणे आवश्यक आहे. त्यानुसार, सध्या आकासा एअरकडे 23 आधुनिक B737 Max विमाने आहेत आणि ही विमाने भारतातील 20 शहरांना जोडतात. या विमान कंपनीचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी चांगले असल्यामुळे लवकरच आकासा एअर(Akasa Air) तुम्हाला भारताच्या सीमा ओलांडून जागतिक प्रवासासाठी घेऊन जाईल.