बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील विमान वाहतूक व्यवसाय सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यातच आकासा एअर( Akasa Air) हि विमान सेवा कायमची बंद होण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. Akasa Air हि विमान सेवा केवळ 13 महिन्यांआधी सुरु करण्यात आली होती, व आता तिची झालेली गंभीर अवस्था पाहता कंपनीचे भविष्य धोक्यात दिसत आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बुडणाऱ्या ‘आकासा’ला मोठा आधार मिळाला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने आकासा एअरलाइनला आंतरराष्ट्रीय ऑपरेटरचा दर्जा दिला आहे.
Akasa Air ची दयनीय अवस्था:
Akasa Air कंपनीच्या 43 वैमानिकांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे दररोज आकासाची 24 विमानांची सेवा रद्द करावी लागत आहे. ऑगस्ट महिन्यात आकासाच्या एकूण 700 विमान सेवा रद्द झाल्या होत्या. या गंभीर परिस्थितीमुळे कंपनी विरुद्ध मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच आकासाकडून 36 वैमानिकांविरुद्ध दिल्ली हाय कोर्टमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. एकूण सर्व परिस्थती पाहता लावकराच ही विमानसेवा कायमची बंद होईल असं वाटत होते. मात्र वैमानिकांच्या कमतरतेला तोंड देत असलेल्या आकासाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आकासा एअरचे ( Akasa Air) संस्थापक आणि CEO विनय दुबे यांनी सांगितले आहे कि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या एरलाईनला आंतरराष्ट्रीय ऑपरेटरचा दर्जा दिला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑपरेटरचा दर्जा मिळाल्यानंतर Akasa Air ने हि पावलं उचलली :
कारकीर्दीच्या पहिल्या वर्षानंतर आकासा एअरला( Akasa Air) अंतरराष्ट्रीय उड्डाण घेण्याची परवानगी मिळाली आहे. यानंतर आता कंपनी दक्षिण आशिया( South Asia), दक्षिण -पूर्व आशिया(South-East Asia)आणि पूर्व आशिया( East Asia) या ठिकाणी विमान सेवा सुरु करण्याची योजना तयार करत आहे. कंपनीचे CEO विनय दुबे यामुळे खुश असून ते म्हणालेत कि या वर्षाच्या शेवटी अंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचं त्याचं स्वप्नं पूर्ण होणार आहे, व परदेशी विमान उड्डाण सेवेवर त्यांच्या अधिकाऱ्यांकडून काम सुरु करण्यात आले आहे.