Akasa Airlines : या विमान सेवेसाठी आनंदाचे दिवस; CEO ने केली मोठी घोषणा

बिझनेसनामा ऑनलाईन । भारताची विमानसेवा काही दिवसांपासून कमकुवत झाली आहे. Go First आणि Akasa Air या दोन विमान सेवांमध्ये अडचणी आल्यामुळे भारतातील विमानसेवेला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. देशातील या स्थितीमुळे अनेक विमान प्रवाशांना महाग तिकिटांचा सामना करावा लागत आहे, मध्यमवर्गीयांसाठी हा पर्याय आता सोयीस्कर राहिलेला नाही. मात्र Akasa Airlinesचे CEO विनय दुबे यांनी एका मुलाखतीत म्हंटल कि ते येणाऱ्या काही दिवसांत नवीन ट्रिपल डीजीट एअरक्राफ्ट आपल्या सेवेत रुजू करणार आहेत.

काय म्हणाले Akasa Airlines चे CEO:

Akasa Airlinesचे CEO विनय दुबे यांचे म्हणणे आहे कि मागचा काळ जरी त्यांच्यासाठी कठीण असला तरीही आता ते प्रगतीच्या मार्गावर पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच ते आपली विमान सेवा परदेशांमध्ये सुरु करणार आहेत, यासाठी लागणारी परवानगी देखील त्यांना मिळाली आहे. Akasa ची आंतराष्ट्रीय विमान सेवा कुवेत, दोहा, रियाध आणि जेयाध या देशांमध्ये सुरु केली जाणार आहे. ते आपल्या कंपनीच्या मेहनतीवर खुश आहेत. गेल्या वर्षी कंपनीकडून उत्तम कामगिरी करण्यात आली होती. 0 पासून 20 विमानांपर्यंत पोहोचणारी त्यांची पहिलीच विमान कंपनी आहे व याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला आहे.

काही महिन्यांपूर्वी परिस्थिती खालावली होती:

Akasa Airlines ला त्यांच्या वैमानिकांनी अचानक सेवा सोडून गेल्यामुळे मोठा फटका बसला होता, या निर्णयामुळे कित्येक विमान सेवा रद्ध कराव्या लागल्या होत्या. मात्र आता विनय दुबे म्हणाले आहेत कि त्यांनी परिस्थती सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आता सध्या त्यांच्याजवळ 450 वैमानिक उपस्थित आहेत व काही दिवसांतच यात 120 नवीन वैमानिकांची भर होणार आहे. येणारा सणासुदीचा काळ आणि आपल्या ग्राहकांच्या गरजा ते ओळखून आहेत व म्हणून ते सामान्य माणसांना परवडतील अश्या दरांमध्ये विमान सेवा देण्याचा प्रयत्न करतील.