Share Market : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने दिला बम्पर रिटर्न; 1 लाखाचे झाले 87 लाख

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट म्हंटल की आपल्याला अनेक चढउतार पाहायला मिळतात. कधी कोणता शेअर वर जाईल आणि कोणाला तोटा सहन करावा लागेल हे सांगणं तस कठीणच. आपण गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट – तिप्पट पैसा यावा असं प्रत्येकाला वाटतं. बऱ्याच कंपन्या लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच आता केमिकल उद्योगाशी संबंधित असलेल्या एका कंपनीने दहा वर्षात गुंतवणूकदारांना 8600 टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न दिलेला आहे. होय, हे खरं आहे.

अल्काईल ईमाईस केमिकल असं या कंपनीचे नाव असून या आठवड्यात कंपनीचे शेअर्स 28 रुपयांवरून चक्क 2400 रुपयांपर्यंत वाढले आहेत. 52 आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सनी 3230.15 रुपयांची हाय लेव्हल गाठली होती तर नीचांक पातळी 2119.05 एवढी पाहायला मिळाली. त्यामुळे ज्या कोणी या शेअर्समध्ये आपले पैसे लावले असतील ते नक्कीच मालामाल झाले असतील यात शंकाच नाही.

मागील 10 वर्षात अल्काइल एमाइंस केमिकल्स च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 8649% परतावा दिला. 12 जुलै 2013 मध्ये अल्काइल एमाइंस केमिकल्सचे शेअर्स भारत आणि आशिया चा स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 28 रुपयांवर होते. 2 जून 2023 ला अल्काइल एमाइंस केमिकल्स कंपनीचे शेअर्स 2449.50 रुपयांवर बंद झाले. म्हणजेच जर जुलै 2013 मध्येच या शेअर्समध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्यांना गुंतवणूकदारांना तब्बल 87.47 लाख रुपये मिळाले असते.