Aman Gupta: सध्या सोनी टीव्हीवर शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू असून, शार्क अमन गुप्ता पुन्हा गुंतवणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या कार्यक्रमाचे पहिले दोन सीझन्सही प्रचंड गाजले होते आणि अमन यांनी स्वत:ने पहिल्या सीझनमधील गुंतवणुकीची माहिती दिली आहे. त्यांनी पहिल्या सीझनमध्ये “Ice Pepsi” चा बँड “Skippy” यांमध्ये 20 लाख रुपये गुंतवले होते आणि अवघ्या दोन वर्षात या ब्रँडने 2900 टक्के परतावा दिला आहे आणि गुंतवणुकीची किंमत जवळजवळ 6 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.
गुंतवणुकीबद्दल काय म्हणले गुप्ता (Aman Gupta)?
Global Business Summit 2024 बोलताना शार्क टॅंकचे सर्वांना आवडणारे शार्क म्हणजेच अमान गुप्ता म्हणाले की त्यांनी शार्क टॅंकच्या पहिल्या सिझनमधल्या स्किपी या कंपनीमध्ये एकूण 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, ज्यामधून त्यांना 6 कोटी रुपयांचा नफा कमवायची संधी मिळाली आहे. सध्या या कंपनीची विक्री वाढली असून आता त्यांचं लक्ष्य FY2025 मध्ये 100 कोटी रुपये महसूल जमा करण्याचं आहे.
शार्क टॅंकने भरपूर शिकवलं:
दोन वर्षांपूर्वी, माझ्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नव्हते, त्यावेळी माझी पत्नी कमावत होती. मी 2021 मध्ये माझं दुसरे स्टार्टअप विकलं. तेव्हाच शार्क टँकचा पहिला सीझन सुरू झाला. मला किती गुंतवणूक केली आहे ते विचारलं मी तेव्हापर्यंत 5 हजार रुपये गुंतवणूक केली होती, ज्याची किंमत 5-10 लाख रुपये होती. त्यामुळे मी शार्क टँकचा पहिला गुंतवणूकदार झालो,” असे अमन गुप्ता यांनी सांगितले. त्यांनी नमिता थापर आणि अनुपम मित्तल या शार्क्ससोबत बसून गुंतवणूक करण्याची कला शिकल्याची कबुली दिली. मी शार्क टँकमध्ये खूप शिकलो आणि आता शार्क टँक बाहेर गुंतवणूक करीत नाही असं त्याचं ठाम म्हणणं आहे.