Amazon EMI On Rupay Card । सध्या देशात सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात भर घालण्यासाठी Amazon ने आता नवीन ऑफर आणली आहे. काही दिवसांपूर्वी सुरु असलेल्या सेलमधून अनेक ग्राहकांनी मनपसंत वस्तूंची खरेदी केली. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी या ऑनलाईन साईटने नवीन बातमी आणली आहे. तुम्ही आता अमेझोनवरून खरेदी करताना Rupay कार्डचा वापर करत EMI भरू शकता. या नवीन योजनेमुळे ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करण सोपं होणार आहे त्याचप्रमाणे स्वस्तात खरेदी करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय असेल.
Amazon सुरु करतोय EMI Through Rupay: Amazon EMI On Rupay Card
देशातील आठ प्रमुख बँका Rupay कार्डचा वापर करून EMI भरण्याची सोय (Amazon EMI On Rupay Card) उपलब्ध करून देतील. या सणासुदीच्या काळात आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा मार्ग उत्तम ठरणार आहे. अमेझोनचा ग्रेट शॉपिंग फेस्टिव्हल काही दिवसांपूर्वी सुरु होता आणि दरम्यान अशी गोष्ट पाहण्यात आली कि अधिकांश ग्राहक EMIचा वापर करून वस्तूंची खरेदी करत आहेत.
हीच बाब लक्षात घेत Amazon कंपनीचे संचालक मयांक जैन म्हणाले कि Rupay क्रेडीट कार्डचा वापर करून (Amazon EMI On Rupay Card) ग्राहकांना जर का वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध करवून दिली तर ते त्यांच्यासाठी जास्ती सोयीस्कर ठरणार आहे. आणि म्हणूनच Amazon कंपनीने NPCI सोबत हातमिळवणी करायचा निर्णय घेतला. या नवीन करारामुळे भारतातील ग्राहकांना सणांच्या काळात ऑनलाईन मार्गाने वस्तूंची खरेदी करणे अधिक स्वस्त होणार आहे. या व्यतिरिक्त अमेझोन आपल्या ग्राहकांना अमेझोन पे लेटर, अमेझोन पे वोलेट किंवा UPI यांच्या वापरातून अधिकाधिक सवलती देण्याचा प्रयत्न करत असतो.