Amazon Flipkart Sale : 70-90% सूट देऊनही Amazon- Flipkart चा व्यवसाय चालतो कसा? काय आहे यामागील सक्सेस मंत्र

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या अमेझोन आणि फ्लिपकार्ट वर सणासुदीच्या काळामुळे सेल (Amazon Flipkart Sale) सुरु झाले आहेत. ऑनलाईन मिळणाऱ्या या गोष्टी बाजारात जाऊन विकत घेण्यापेक्षा आपल्याला सोयीस्कर वाटतात आणि म्हणून दिवसेंदिवस त्यांचा ग्राहकवर्ग वाढत चालला आहे. सेलच्या वेळी अनेक वस्तू आपल्याला कमी पैश्यात उपलब्ध झाल्यामुळे साहजिक खुश होत आपण गरजेच्या सर्व गोष्टी विकत घेतो, पण कधी विचार केला आहे का 70% किंवा 80% सूट देऊन या कंपन्यांना नेमका फायदा होतो का? आणि फायदा होत असेल तर तो कसा? चला तर मग हेच आज आपण जाणून घेऊयात.

भरपूर सूट देऊन सुद्धा कसा होतो फायदा? Amazon Flipkart Sale

Amazon आणि Flipkart अश्या सेलमधून (Amazon Flipkart Sale) जास्तीत जास्त 90 हजार कोटी रुपयांचा व्यापार करतात. आता 90 हजार करोड हा आकडा काही छोटा नाही, आणि मोठा डिस्काउंट देऊन सुद्धा एवढा फायदा होतो तरी कसा? यामागे अनेक कारण आहेत. सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे या कंपन्या कोणतही दुकान चालवत नाहीत,त्या फक्त बाकी लोकांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी एक प्लेटफॉर्म तयार करवून देतात. त्या स्वतः कोणतेही दुकान चालवत नसल्यामुळे जास्तीत जास्त खर्च इथेच वाचतो.

ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचं काम सुद्धा ते होलसेलचं (Wholesale) तंत्र वापरून करतात, यामुळे कसा फायदा होतो तर अमेझोन किंवा फ्लीपकार्ट यांना कोणत्याही प्रकारचा स्टोर कॉस्ट भरावा लागत नाही. आणि स्टोर कॉस्टचे पैसे वाचवून या दोन्ही कंपन्या अजून जास्ती फायदा करवून घेतात. इथेच कंपन्यांना होणारा अजून एक फायदा लपलेला आहे तो म्हणजे या कंपन्या कधीच स्वतः माल तयार करत नाहीत त्यामुळे तो माल साठवून ठेवण्याची त्यांना गरज असत नाही, परिणामार्थी माल खराब होण्याच्या जबाबदारीपासून ते दूर राहतात.

आपल्या दुकानदारांना ज्या काही ऑर्डर्स ते देतात त्या नेहमीच एक दोन नसून होलसेलमध्ये असतात. त्यामुळे अश्या दुकानदारांकडून अमेझोन आणि फ्लीपकार्टला चांगली ऑफर मिळवायला मदत होते.आणि शेवटी या वस्तूंची घरपोच डिलिवरी देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा या कंपन्यांच्या खांद्यांवर नसून ती पूर्णपणे कुरियर सर्व्हीसीसची असते त्यामुळे दरम्यान होणाऱ्या नुकसानीसाठी कंपन्या जबाबदार ठरत नाहीत.

Amazon- Flipkart वापरतात हा इकोनोमिक्सचा फंडा:

इकोनोमिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर या कंपन्या बाजारातील डिमांड पाहून त्या त्या वस्तूंचा सप्लाय करतात. समजा दिवाळी जवळ आल्यामुळे दिव्यांना जास्ती मागणी आहे, तर या कंपन्या काय करतील दिव्यांवर जास्ती सूट देऊ करतील ज्यामुळे बाजारातील डिमांड कायम राहायला मदत होते.आणि मागणी अधिक वाढतच अचानक या दिव्यांचा सप्लाय कमी करतील ज्यामुळे किमतींमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळेल, आणि हाच फंडा वापरून कंपन्या आपला व्यवसाय जोरात सुरु ठेवतील.