Amazon Great Freedom Festival Sale 2023 । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ॲमेझॉन ओळखले जाते. अमेझॉनने 15 जुलैला अमेझॉन प्राईम डे सेल सुरू केला होता. यावेळी ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट, बँक ऑफर देण्यात आल्या होत्या. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, अप्लायन्सेज, होम, किचन, फर्निचर, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट या सर्व वस्तूंवर शानदार सूट देण्यात आली होती. जर तुम्हाला या सेलचा फायदा घेता आला नसेल तर कंपनीने पुन्हा एक सेल ग्राहकांसाठी आयोजित केला आहे. या सेलचे नाव ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल आहे.
ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल (Amazon Great Freedom Festival Sale 2023) हा सेल पाच दिवस असणार आहे. हा सेल 5 ऑगस्ट पासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालेल. त्याचबरोबर जर तुम्ही ॲमेझॉन प्राईमचे मेंबर असाल तर तुमच्यासाठी हा सेल 12 तासांपूर्वीच सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही 4 ऑगस्ट दुपारी बारा पासून या सेलचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर डिस्काउंट देण्यात येणार आहेत.
अमेझॉन ने अजून या (Amazon Great Freedom Festival Sale 2023) सेलमध्ये देण्यात येणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट बद्दल खुलासा केलेला नसून ग्राहक या सेल चा फायदा मोठ्या पसंतीने घेऊ शकतील. एसबीआय कार्ड युजर्स साठी क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वर खरेदी केल्यास दहा टक्के सूट देण्यात येणार असल्याचं उघड झालं आहे. त्याचबरोबर या सेलमध्ये 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऍमेझॉनच्या या सेलमध्ये ३० लाख पेक्षा जास्त प्रोडक्स असणार आहे आणि त्यावर 30 टक्के एक्स्ट्रा सूट देण्यात येणार आहे.
कोणत्या वस्तूंवर किती सूट मिळणार ? (Amazon Great Freedom Festival Sale 2023)
या ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल या सेलमध्ये मोबाईल आणि ॲक्सेसरीज वर 40% सूट तर लॅपटॉप आणि गेमिंग लॅपटॉप वर देखील 40% सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट वॉच वर 80 टक्के, स्मार्ट टीव्हीवर 60%, टॅबलेट वर 50%सूट देण्यात येऊ शकते. एवढेच नाही तर हेडफोन स्पीकर आणि कम्प्युटर ॲक्सेसरीज वर देखील 75 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये अलेक्सा फायर टीव्ही आणि किंडल डिवाइस वर 55 टक्क्यांपर्यंत सूट आणि स्टोरेज डिवाइसवर 70% पर्यंत सूट मिळू शकते.