Amazon Great Indian Festival Sale उद्यापासून सुरु; या वस्तू स्वस्तात मिळणार

Amazon Great Indian Festival Sale । ऑनलाईन शॉपिंग हा आजच्या जगातला एक अविभाज्य भाग बनलेला आहे. घर बसल्या तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी सहज विकत घेऊ शकता. यासाठी कुठल्याही दुकानात पायपीट करत जाण्याची गरज नाही, जर का त्या वास्तूमध्ये काही त्रुटी असलीच तर तेवढ्याच सहजपणे तुम्ही ती परत देखील करू शकता. Online Shopping साठी Flipkart आणि Amazon विशेष करून ओळखले जातात. या Shopping कंपन्यांना दरदिवशी भरपूर फायदा होत असतो, आणि आपल्या ग्राहकांसाठी सुद्धा ते वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असतात. सध्या सगळ्यांना उत्कंठा लागून आहे ती म्हणजे अमेझोन ग्रेट इंडिअन फेस्टिव्हलची (Amazon Great Indian Festival Sale). उद्यापासून हा सेल सुरु होणार असून तुम्हाला सर्व गोष्टी अगदी स्वस्तात मिळत आहेत.

25 हजारपेक्षा जास्त वस्तूंवर बंपर सूट – Amazon Great Indian Festival Sale

उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबरपासून देशात अमेझोन ग्रेट फेस्टिव्हल सुरु होणार आहे. आपल्या प्राईम मेम्बर्ससाठी अमेझोन हा सेल चोवीस तास आधीच खुला करणार आहे. मोठ्या प्रमाणात सेलचा फायदा करत घेत वेगवेगळ्या वस्तू विकत घेण्याची चांगलीच संधी चालून आली आहे. जवळपास 25 हजारपेक्षा जास्ती उपयोगी वस्तूंची आकर्षक दारात अमेझोन विक्री करणार आहे. ग्रेट अमेझोन सेलमध्ये ( Amazon Great Indian Festival Sale ) टीव्ही, मोबाईल,हेडफोन, किचन आणि होम अप्लाय्न्सीस, फेशन आणि बियुटी प्रोडक्ट्स यांचा समावेश असणार आहे.

वेगवेगळ्या भाषेत मिळणार सेवा –

आपले ग्राहक विविध भागांतील आहेत हे जाणून अमेझोनकडून वेगवेगळ्या भाष्यांमध्ये हि सेवा पोहोचवली जाईल. या भाष्यांमध्ये हिंदी आणि इंग्रजी यांच्याशिवाय तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड, बंगला आणि मराठी या देखील भाष्यांचा वापर होणार आहे. याशिवाय No Cost EMI ची विशेष संधी इथे ग्राहकांसाठी खुली केली जाईल, हा सेल अजून विशेष असण्याच कारण म्हणजे सेलमधल्या काही गोष्टी तुम्ही Exchange Offer चा वापर करून सुद्धा विकत घेऊ शकता.

(Amazon Great Indian Festival Sale) 19 हजारपेक्षा जास्ती ठिकाणी घरपोच जाऊन Amazon गोष्टी पोहोचवणार आहे. आपल्या ग्राहकांना खुश करण्याची एकही संधी न सोडता Amazon उपकरणांचे Installation, Trouble Shooting आणि बाकी दुरुस्तीचीही कामं करून देणार आहे. Amazon चा यामागील एकमेव उद्देश आपल्या ग्राहकांना खुश करण्याचा आहे असे वक्तव्य Amazon India चे कंझ्युमर बिजनेस उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक मनीष तिवारी यांनी केले.