Amazon India जलमार्गाने करणार वस्तुंची डिलिव्हरी; काय आहे नवीन योजना?

Amazon India : प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी Amazon सर्वांच्याच परिचयाची आहे, अनेकवेळा आपण कितीतरी गोष्टी Amazon वरून विकत घेत असतो. आणि एवढा मोठा ग्राहक वर्ग असलेली हि कंपनी आता एक नवीन प्रकल्प सुरु करण्याच्या तयारीत आहे, हा प्रकल्प काही साधासुधा असणार नसून यात गंगा नदीचा वापर करून वस्तूंची डिलिवरी केली जाणार आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हि बातमी खरी आहे, Amazon India खरोखरच या अनोख्या प्रकल्पाच्या तयारीत गुंतलेली आहे. आज जाणून घेऊया काय आहे अमेझोनचा नवीन गंगा प्रकल्प

Amazon India चा नवीन गंगा प्रकल्प:

बुधवारी अमेझोन कंपनीच्या सेलर सर्विसेज आणि इनलैंड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाने हा नवीन करार अधिकृतरित्या जाहीर केला आहे. आता नदीचा वापर करून कंपनी कार्गो मूवमेंटला चालना देईल आणि हाच या प्रकल्पाचा प्रमुख उदेश असणार आहे. भारत सरकारच्या जलवाहतूक मंत्रालयाकडून या प्रकल्पाला संमती मिळाली असल्यामुळे आता कंपनी नद्यांचा वापर करून वस्तूंची डिलिवरी करणार आहे. भारत सरकारच्या जलवाहतूक मंत्रालयासोबत झालेल्या या कराराद्वारे अमेझोन आपली पुरवठा साखळी अंतर्देशीय जलमार्गाद्वारे 14500 किलोमीटरपर्यंत वाढवू शकते. तसेच जलवाहतुकीच्या या माध्यमामध्ये नद्या, कालवे, बॅकवॉटर आणि रीक्स इत्यादींचा समावेश केला जाईल.

Amazon India ने याधीच हवाई मार्गाने वस्तूंची डिलिव्हरी करण्याचा प्रकल्प सुरु केला होता, ज्यामुळे कंपनीला भल्यामोठ्या प्रमाणात फायदाही झाला. त्यानंतर आता कंपनी जलमार्गाने वस्तूंची डिलिव्हरी करण्याची नवीनं मोहीम आखत आहे, आणि यामधून देखील त्यांना भलामोठा फायदा होऊ शकतो. तसेच जल परिवहन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. जल परिवहनाचा वापर हा निसर्गाच्या दृष्टीने जास्ती हिताचा समजला जातो. भारतातील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला प्रकल्पाला चालना दिली आहे आणि त्याअंतर्गत 113 प्रकल्प उभारले जाणार आहेत, ज्यांची किंमत 7030 कोटी रुपयांच्या आसपास असेल.