Amazon One Payment। पूर्वी आपण कॅश देऊन व्यवहार करत होतो. आता ही कॅश सुविधा थोड्या प्रमाणात कमी होऊन आपण कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करायला सुरुवात केली. परंतु कार्ड प्रत्येक ठिकाणी चालत नसल्यामुळे गुगल पे, फोन पे, यूपीआय, या सुविधा उपलब्ध झाल्या. त्यानुसार आपण मोबाईलच्या माध्यमातूनच पेमेंट करू लागलो. म्हणजेच कॅशलेस सुविधा उपलब्ध झाल्या. आणि आता तर टेक्नॉलॉजी एवढी बदलली आहे की आपण फक्त हात दाखवून पेमेंट करू शकतो. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटलं असेल. परंतु ॲमेझॉनने आता एक अजब गजब अशी सर्विस आणली आहे.
अमेझॉनने आता डिजिटल पेमेंटच्या पुढचा पर्याय निवडला आहे. म्हणजेच एक पाऊल पुढे टाकून अमेझॉन आता नवीन टेक्नॉलॉजीने परिपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ते कसं हे आपण जाणून घेणार आहोत. अमेझॉन ने एक अशी टेक्नॉलॉजी आणली आहे. ज्याच्या माध्यमातून हात दाखवून आपण पेमेंट करू शकतो. या टेक्नॉलॉजीचं नाव Amazon One Payment आहे. याची घोषणा नुकतीच अमेझॉनने केली. एवढेच नाही तर सर्वच स्टोअरवर या टेक्नॉलॉजीची सुरुवात देखील झाली आहे. अमेझॉन प्राईम मेंबर्सला ही टेक्नॉलॉजी पूर्वीपासूनच देण्यात आलेली होती. अमेझॉन ने आता बाकीच्या स्टोअर्सवर देखील लवकरात लवकर ही टेक्नॉलॉजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा घ्या लाभ – Amazon One Payment
तुम्हाला देखील या टेक्नॉलॉजी चा (Amazon One Payment) फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला amazon one Kiosk वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी तुमचे डेबिट कार्ड तुम्हाला टर्मिनल मध्ये ठेवावे लागेल. त्यानंतर रीडर वर तुम्हाला हात फिरवावा लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
सुरक्षित पेमेंटसाठी हाताचा वापर –
आता तुम्हाला वाटत असेल की या सर्विस साठी फक्त हातच का निवडला गेला असेल. तर याचं कारण आहे की फिंगर प्रिंट लॉक प्रमाणेच हॅन्ड स्कॅनर देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फिंगर प्रिंट प्रमाणे प्रत्येकाचा हॅन्ड प्रिंट देखील बदलत असतो. म्हणजेच कोणीही तुमचा हात क्लोन करू शकणार नाही. आणि त्यामुळे सुरक्षित पेमेंट मोड उपलब्ध होईल. या सर्विस च्या माध्यमातून तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, डिटेल्स थर्ड पार्टी सोबत शेअर कलेची जात नाही. सरकारी एजन्सी कडून काही ऑर्डर आल्यास हा डाटा शेअर केला जातो. वापरकर्त्याचा बायोमेट्रिक डेटा AWS क्लाऊड मध्ये संग्रहित केला जातो. आणि या क्लाऊड स्टोअरला सिक्युअर मानले जाते.