Amazon Pay। ऑनलाईन शॉपिंग तर तुम्ही अनेकवेळा केलंच असेल. ऑनलाईन जगात वावरण खूपच सोपं झालेलं आहे, ना बाहेर जाऊन खरेदी करण्याची चिंता ना हातात पैसे घेऊन फिरण्याची गरज. पण तुम्हाला माहिती आहे का ऑनलाईन फक्त खरेदीच करता येते अश्यातला भाग नाही. तुम्ही जसे इतरांना पैसे पाठवता तश्याच प्रकारे तुम्ही वीज बिल (Electricity Bill), पाण्याचं बिल(Water Bill) अशी बिलं सुद्धा ऑनलाईनच भरू शकता, त्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. आता अमेझोन पे (Amazon Pay) चा वापर करत सुद्धा असे व्यवहार सोपे झाले आहेत. त्यामुळे आता घरबसल्या एका क्लिकवर कसे हे काम कराल पाहूयात…
एका क्लिकवर भरा बिल:
आता ऑनलाईन सुविधेमुळे घर बसल्या कामे चटचट होऊन जातात. यामध्ये विजेचं बिल असो किंवा क्रेडीट कार्ड बिल, मोबाईलचा रिचार्ज किंवा सिलिंडरचं भाडं सगळेच अगदी सहजरीत्या सोपं झालं आहे. यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Amazon वर तुमचे अकाउंट असणे. त्यानंतर अमेझोन पे (Amazon Pay) चा वापर करून अगदी काही मिनिटांत तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. Amazon तुम्हाला वेगवेगळी बिलं भरण्याची परवानगी देतो, ज्यात विजेचं बिल,गेस बिल,पाण्याचं बिल, ब्रोडबेंड इत्यादींचा समावेश होतो.Amazon इथेच थांबत नाही तर तुमच्या समोर लोन रीपेमेंट (Loan Repayment),इन्शुरन्स प्रीमियम (Insurance Premium), एज्युकेशन फी(Education Fees), गाडीचा इन्शुरन्स या प्रकारची आर्थिक कामं करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Amazon Pay वरून कसं भराल बिल:
तुम्ही अमेझोन पे (Amazon Pay) चा वापर करून हि बिलं भरणार असाल तर इथे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI, क्रेडीट कार्ड यांच्यापैकी कोणाचाही वापर करून बिल भरता येतं. सगळ्यात आधी तुम्हाला जे बिल भरायचं आहे तो पर्याय सर्वात आधी निवडावा, त्यानंतर बिल भरण्यासाठी लागणारी सगळी माहिती दिलेल्या जागेत समाविष्ट करावी, त्यानंतर तुमच्यासमोर बिल भरण्याचा पर्याय (Pay Bill) उपलब्ध होईल, तो निवडून बिलाची रक्कम भरून टाकावी.
अमेझोन पे (Amazon Pay) हे जलद काम करण्यासाठी ओळखलं जात आहे, या माध्यामतून तुम्ही 50 हजार पर्यंत बिल भरू शकता. वापरण्यासाठी सुद्धा हा सोपा पर्याय असल्यामुळे वापरकर्त्यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. अमेझोनच्या वापरकर्त्यांकडून त्याला 10 पैकी 9 रेटिंग देण्यात आले आहेत, तर झटपट पेमेंटसाठी 84 टक्के यूजर्सनी अमेझोनबद्दल पसंती दर्शविली आहे.