Amazon : नोकरी सोडतानाच Amazon कर्मचाऱ्यांना देतेय 4 लाख रुपये

Amazon: जगप्रसिद्ध ऑनलाईन कंपनी Amazonआता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. तुम्ही कधी नोकरी सोडण्यासाठी कर्मचाऱ्याला कंपनीकडून पैसे देताना ऐकलं आहे का? अजिबातच नसेल पण आज Amazon आपल्या कर्मचाऱ्यांसोबत असंच काही करण्याच्या विचारात आहे. नोकरी सोडण्यासाठी कर्मचाऱ्याला कंपनीकडून 2000 डॉलर्स देऊ करणार आहे आणि जसजशी कर्मचारी आपल्या प्लॅनमध्ये वाढ करेल तशी त्याच्या मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ केली जाणार आहे.

जेफ बेजॉस देणार नोकरी सोडल्यानंतर पैसे:

जेफ बेजॉस (Jeff Bezos) हे हे जगातील तिसरे सर्वात श्रींमंत माणूस आहेत. आणि Amazon चे मालक आहेत. आणि आज पर्यंत बाजारात न घडलेली गोष्ट त्यांनी करून दाखवली आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यानंतर ते तब्बल 4 लाख रुपये देणार आहेत. कुणी कोणाला नोकरी सोडण्यासाठी पैसे देतो का? असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाली असेल आणि ते स्वाभाविक आहे. पण अमेझोन कंपनी हि नवीन योजना राबवत आहे आणि याला कंपनीकडून Pay To Quit असे नाव देण्यात आले आहे.

Amazon ची हि भलतीच योजना का?

कंपनीकडून हि भलती योजना राबवण्याचं एकमेव कारण म्हणजे कंपनीला नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करायची आहे.नवीन नोकरी हातात येई पर्यंत कंपनी कडून त्यांना हि आर्थिक मदत दिली जाणार आहे. सुरुवातील कंपनी आपल्या नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2000 डॉलर्स देऊ करेल आणि जर का हा प्लेन जर का एका वर्षासाठी वाढवण्यात आला तर हीच रक्कम वाढून 3000 डॉलर्स होईल मग जसजसा अवधी वाढेल तशीच रक्कमही वाढत जाईल, आणि हि रक्कम 5000 डॉलर्स पर्यंत सुद्धा जाऊ शकते. यासोबतच Amazon ने एक टॅगलाईन दिली आहे ज्यात ते म्हणतात कि Dont Take This Job, यायचं अर्थ असा कि कंपनी पूर्णपणे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्वल करणारी अशी हि एक योजना आहे.