Ambani Property : मुकेश अंबानींच्या मुलाच्या घड्याळाची किंमत किती? इतक्या पैशांत बॉलिवूडचे 5 चित्रपट बनतील

बिझनेसनामा ऑनलाईन (Ambani Property) | उद्योगपती नेहमीच त्यांच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. कोणाला महागड्या गाड्यांची क्रेझ असते तर कोणाला महागड्या बंगल्यांची. भारतात अनेक मोठ्या उद्योगपतींकडे स्वतःची विमाने, हेलिपॅड आहेत. त्यात मुकेश अंबानींचे (Mukesh Ambani) नाव घेतले तर विषयच खोल आहे. मुकेश अंबानी यांच्या मुलाचं नुकताच लग्न पार पडलं. या लग्नातील अंबानी कुटुंबीयांचा थाट पाहून अनेकांचे होश उडले आहेत. आज आम्ही तुम्हला अंबानी यांच्या मुलाच्या एका घड्याळाची किंमत सांगणार आहोत.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच नीता-मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जिओ पार्कमध्ये बांधलेल्या या NMACC केंद्राच्या उद्घाटनासाठी बॉलिवूड व्यतिरिक्त जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती पोहोचल्या. यादरम्यान सर्वांच्या नजरा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्यावर खिळल्या होत्या. खरंतर अनंतच्या हातात एक चकचकीत आलिशान घड्याळ होतं, ज्याच्या किमतीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

या घड्याळाची किंमत किती आहे?

NMACC च्या दुसऱ्या दिवशी अनंत अंबानी काळ्या सूटमध्ये आले. यावेळी त्याच्या हातात पाटेक फिलिप ब्रँडचे लग्झरी घड्याळ होते. अनंत अंबानी यांनी ग्रँडमास्टर चाइम वॉच एडिशन घातला होता. या आलिशान घड्याळाची किंमत इतकी आहे की त्यात ‘विकी डोनर’सारखे ५ चित्रपट आरामात बनवता येतील. होय, या लक्झरी घड्याळाची किंमत 18 कोटी आहे. Ambani Property

अनंत अंबानींना लक्झरी लाइफस्टाइल आवडते.

अनंत अंबानींना लग्झरी लाइफस्टाइल आवडते. त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात रोल्स रॉयस फँटम सारखी वाहने आहेत, ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. याशिवाय अनंतकडे BMWi8 (रु. 2.5 कोटी), Mercedes Benz G63 AMG (रु. 2.5 Cr), Range Rover Vogue (Rs 2.30 Cr), Mercedes Benz S-Class (रु. 1.5 Cr) आहेत.

राधिका मर्चंटशी लग्न

अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंटसोबत १९ जानेवारी २०२३ रोजी लग्न केले. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये या दोघांनीही राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात रोका सोहळा पार पाडला होता. अनंत अंबानी यांची भावी पत्नी राधिका खूप सुंदर आहे. राधिकाच्या सौंदर्यापुढे मोठमोठ्या नायिकाही फिक्या पडतात. राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाला अंजली मर्चंट नावाची मोठी बहीण देखील आहे. अंजलीने 2020 मध्ये ‘वाटली’चे संस्थापक अमन मजिठियासोबत लग्न केले. Ambani Property