Amrit Bharat Express : या ट्रेनमधून करता येणार स्वस्तात प्रवास; मिळणार मेट्रो सारख्या सुविधा

Amrit Bharat Express: भारतात अजूनही रेल्वे प्रवासाला भरपूर महत्व दिलं जातं. लाखोंच्या संख्येने प्रवासी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी रेल्वेची निवड करतात. रेल्वेचा प्रवास बाकी साधनांच्या तुलनेत स्वस्त असल्याने सामान्य माणसाला रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर वाटत असावा. भारतीयांची हीच पसंत लक्ष्यात घेत भारत सरकारने वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केली. अनेक सुख सुविधांनी समृद्ध अशी हि वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वे प्रवास खास बनवते. अनेक प्रवाशांच्या मनात आजही वंदे भारत रेल्वेचा प्रवास म्हणजे एक खास आकर्षण आहे, मात्र प्रवाशांची पाऊले मागे सारतात ती केवळ ती तिकिटांच्या खर्चामुळे. रेल्वे प्रवास हा वरती म्हटल्या परिमाणे स्वस्त मानला जातो तरीही वंदे भारतच्या अवाढव्य तिकीट खरेदी सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या नाहीत. यावर पर्यायी मार्गाच्या स्वरूपात आता लवकरच भारतात अमृत भारत एक्सप्रेस धाव घेणार आहे.

लवकरच रुळावर धावणार अमृत भारत एक्सप्रेस: (Amrit Bharat Express)

अमृत भारत एक्सप्रेस ही ट्रेन खास करून सामान्य जनतेसाठी बनवली असून, भारत सरकारकडून याला “आम आदमी कि खास ट्रेन” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनची सुरुवात करतील. वर्ष 2023 संपण्यास आता क्वचित दिवस उरलेले असताना भारत सरकार कडून घेण्यात आलेला हा महत्वाचा निर्णय ठरणार आहे. देशभरात श्रीराम जन्मभूवर होणाऱ्या मंदिर उभारणीची चर्चा सुरु असतानाच हि नवीन ट्रेन अयोध्येला सीता मातेच्या जन्मस्थानाशी म्हणजेच बिहारच्या सीतामढीशी जोडेल. या ट्रेन बद्दल अधिक सांगायचं म्हणजे हि नवीन ट्रेन पुश अँड पूलची सेवा प्रदान करेल, याचाच अर्थ असा कि अमृत भारत ट्रेन रुळावर सर्वाधिक स्पीडने धावेल. अमृत भारत ट्रेनची स्पीड 130 किमी प्रति तासाने अंतर कापण्याचे काम करेल.

पांढऱ्या आणि निळ्या रंगात ऐटित धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तुलनेत नवीन अमृत भारत एक्सप्रेस भगव्या रंगात आपली शान जगाला दाखवेल (Amrit Bharat Express). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रेनमध्ये एकूण 22 कोच असतील, ज्यात 12 सेकंड क्लास, 3 टायर स्लीपर आणि 8 जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश असेल. 1800 प्रवाशांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये CCTV, मोर्डन टॉयलेट, सेन्सर वॉटर टेप, मेट्रो सारखी अनाउंनसिंग सिस्टम उपलब्ध असेल. मात्र लक्ष्यात घ्या कि एवढ्या सुखसुविधा प्रदान करून देखील या ट्रेनची तिकिट्स परवडणाऱ्या दारांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

काय असेल अमृत भारत ट्रेनचे तिकीट?

अमृत भारत ट्रेनची सुरुवात खास करून सामान्य जनतेसाठी करण्यात आली आहे, म्हणूनच त्यांना परवडेल अश्या किमतींमध्ये अमृत भारत ट्रेनचे तिकिट्स कमी किमतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील (Amrit Bharat Express). या ट्रेनमधून उत्तर प्रदेश आणि बिहारमधले श्रमिक मजूर सुखकर प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहेत. म्हणूनच या ट्रेनच्या किमती इतरांच्या तुलनेत बऱ्याच पैकी कमी असतील.