Amrit Kalash Scheme | भारतात गुंतवणूकीच्या अनेक योजना राबवल्या जातात. यामुळे गुंतवणूकदार चांगल्या प्रकारे आपल्या पैश्यांची आखणी करु शकतात. सरकारी किंवा खासगी bank व्दारे या योजना राबविल्या जातात. आज आपण अशा एका योजनेबद्दल जाणून घेऊया जी आपल्याला खातेदारांना भरपूर प्रमाणात रिटर्न देऊ करते. State Bank Of India व्दारे ही योजना सुरू करण्यात आली असून ही योजना नेमकी काय आहे ? आणि यामध्ये गुंतवणूकदारांना कसा फायदा होतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे ही योजना व कोणा अंतर्गत चालते?
अमृत कलश योजना (Amrit Kalash Scheme) असे या योजनेचे नाव असून ती State Bank Of India व्दारे राबवली जात आहे. या योजनेचा कालावधी सुरुवातीला फारच कमी निश्चित करण्यात आला होता पण तो बदलून आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. ही योजना गुंतवणूकदारांना Fix Deposit म्हणजेच FD वर मोठ्या प्रमाणात व्याज देऊ करते. State Bank Of India च्या अमृत कलश योजनेची सुरुवात 12 एप्रिल 2023 पासून झाली होती. याचा कालावधी फारच कमी होता. या योजनेचा वापर Online व Offline दोन्ही Platforms वर करता येतो.
State Bank of India ची ही योजना कशी चालते? (Amrit Kalash Scheme)
ही योजना गुंतवणूकदारांना 400 दिवसांसाठी कमीत कमी 2 करोड रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी देते. इथे गुंतवणूकीच्या रक्कमेनुसार प्रती महिना, तीन महिने व सहा महिन्यांप्रमाणे व्याज दिलं जातं. या योजनेत वृद्धांसाठी 7.6 % असा व्याज दर निश्चित करण्यात आला आहे व हा दर इतर गुंतवणूकदारांसाठी 7.1 % इतका आहे.
लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हे कामं तुम्ही घर बसल्या सुद्धा करु शकता. स्टेट बँक व्दारे Online Banking ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने लोकांना याचा भरपूर प्रमाणात फायदा होत आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास सुमारे 1 करोड रुपयांचे Fixed Deposit करणार्यांना बॅंक कडून ८.०१७ रुपयांपर्यंत व्याज दर दिला जातो.
मात्र ही योजना देखील आयकर विभागाच्या अंतर्गत असल्याने विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या योजनेत डीटीएस आकारला जातो. Fixed Deposit म्हटलं की एकदा गुंतवणूक केलेली रक्कम आपल्याला कालावधी पूर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही. पण कोणी जर का वेळेच्या आधी पैशांची रक्कम काढण्यास इच्छूक असेल तर ती संधी इथे उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार रक्कम परत घेतली जाऊ शकते.