Amul Milk in US: अमूल पहिल्यांदाच चाललाय अमेरिकेला; आता व्यवसाय जाणार समुद्रापार

Amul Milk in US: आपल्या देशात सर्वाधिक प्रसिद्ध असलेली दूध विक्रेती कंपनी म्हणजे अमूल, अमूल कंपनी जाहिरातींमध्ये देखील एकदम उघडउघडपणे सांगते की, ” अमूल दूध पिता हैं इंडिया!!”. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशात दमदार कामगिरी बजावल्यानंतर आता ही कंपनी समुद्र पार करून थेट अमेरिकेत जाऊन व्यवसाय करणार आहे, याचाच अर्थ आता अमेरिकेत वावरणारा भारतीय किंवा परदेशी माणूस देखील अमूलची सेवा मिळवू शकणार आहे.

अमूल जाणार अमेरिकेत: (Amul Milk in US)

अमूल कंपनीने अमेरिकेत व्यवसाय सुरु करण्यावर शिक्का मोर्तब केलेला असून त्यांनी मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन(Michigan milk producers association) सोबत हातमिळवणी केली आहे. ही कंपनी अमेरिकेतील बरीच जुनी आणि अनुभवी दुग्ध सहकारी संस्था म्हणावी लागेल आणि म्हणूनच आपल्या गुजरातमधील अमूल कंपनीला हा करार पक्का करताना अधिक आनंद झाला आहे.

कंपनीचे managing director मेहता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारतातील प्रसिद्ध दुग्ध संस्था म्हणजेच अमूल पहिल्यांदा देशाची सीमा ओलांडून बाहेर जाण्याच्या तयारीत आहे, आणि त्यांना विश्वास आहे की नक्कीच ही मोहीम साध्य होईल(Amul Milk in US). अमेरिकेच्या लोकांना आता त्यांच्या आवडीनुसार चविष्ट आणि आरोग्यदायक अमूल दूध एक लीटर (3.8 लिटर) आणि अर्धा लीटर (1.9 लिटर)च्या पॅकमध्ये मिळणार आहे. विशेष म्हणजे, आपल्याला भारतात मिळणारे अमूल गोल्ड, शक्ती, फ्रेश आणि स्लिम variants अमेरिकेतही उपलब्ध असणार आहेत. अमूल गोल्डमध्ये 6 टक्के fats तर अमूल स्लिममध्ये 2 टक्के fats असे वेगवेगळे पर्याय अमेरिकेतील लोकांना निवडण्यासाठी उपलब्ध होतील.