Amway India ED News : Amway India कडून 4050 कोटीची लुबाडणूक करण्यात आल्याचा ED चा आरोप

बिझनेसनामा ऑनलाईन । डायरेक्ट सेलिंग फर्म एमवे इंडिया (Amway India ED News) सध्या बरीच चर्चेत आहे, या कंपनीचं चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याच्या विरुद्ध चाललेली ED ची तपासणी होय. एमवे इंडियाच्या विरोधात सध्या 4000 कोटी रुपयांचा मनी लोन्डरिंगचा खटला सुरु असून ED ने हैद्राबाद विशेष न्यायालयामध्ये या गुन्ह्याची नोंद केली आहे. गुंन्हा दाखल झाल्यानंतर एमवे इंडिया या कंपनीबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत, आजही अशीच एक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पण त्याआधी थोडक्यात जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

Amway India चा गुन्हा काय? Amway India ED News

ED ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एमवे इंडियाच्या विरोधात प्रिवेन्शन ऑफ मनीलोंडरिंग कायदा 2002 च्या अंतर्गत खटला जारी केला आहे. हि तक्रार नोंदवताना ED ने तेलंगणा पोलिसांनी एमवे इंडियाच्या संचालनाविरुध्द दाखल केलेल्या FIR चा आधार म्हणून समावेश केला होता. एमवे इंडिया उत्पादनांची विक्री या नावाखाली बेकायदेशीरपणे मनी सर्क्युलेशन स्कीमचा वापर करत आहे असा आरोप ED कडून लावण्यात आलाय. Amway India नवीन लोकांना सामील करून घेण्यासाठी भरपूर रक्कम आकारते आणि शब्द देऊन त्यांची फसवणूक करते असाही आरोप ED कडून करण्यात आला आहे.

ED चा तपास काय सांगतो?

ED च्या तपासानुसार Amway India अनेक मध्यस्थींचा वापर करून मल्टी लेव्हल मार्केटिंग करत आहे आणि या साखळी प्रक्रियेत शीर्षकस्थानी असलेल्या पदाधिकाऱ्यांना भरपूर फायदा होतोय. ED ने एमवे इंडियाने केलेली फसवणूक (Amway India ED News) जगासमोर आणली असून त्यांनी एकूण 4,050.21 कोटी रुपये कमावल्याच एक प्रकरण उघडकीस आले आहे. याशिवाय एमवे इंडियाकडून कमाईतला 2,859 कोटी रुपये एवढा मोठा हिस्सा परदेशात पाठवण्यात आलाय. आत्तापर्यंत ED ने एमवे इंडियाची 757.77 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र याबद्दल बोलताना एमवे इंडिया म्हणते कि हे प्रकरण 2011च्या तक्रारींशी निगडीत आहे आणि सध्या ते तपासाला संपूर्ण सहकार्य करीत आहेत. एमवे इंडिया गेल्या 25 वर्षांपासून देशात व्यवसाय करत असून याबद्दलचे सर्व तपशील त्यांनी ED ला दिलेले आहेत.