Anand Mahindra On ChatGPT : आनंद महिंद्रांचे ChatGPT वर महत्वाचे विधान; म्हणाले की, माहिती गोळा होतेय पण….

Anand Mahindra On ChatGPT : देशातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजेच आनंद महिंद्रा हे इतरांच्या तुलनेत सर्वाधिक सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या फॉलोवर्सची संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यांच्या काही समस्या असतील तर त्यादेखील महिंद्रा कंपनीच्या मालकाकडून सोडवल्या जातात. त्यांच्या याच शैलीमुळे आनंद महिंद्रा हे सोशल मीडियाच्या युगात तरुणाईच्या पसंतीत उतरले आहेत. काही वेळा ट्रेडिंग सोशल मीडिया पोस्टवर ते आपले रंजक आणि हास्यास्पद प्रतिक्रियांमधून तरुण पिढीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच त्यांनी AI tool बाबत आपली प्रतिक्रिया नोंदवल्याने ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.

तमिळनाडूमध्ये होत असलेल्या ग्लोबल इन्वेस्टर समिटला ते उपस्थित होते आणि यावेळीच Open AI Chatbot वापरण्याचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. आनंद महिंद्रा हे मुळातच प्रसिद्ध असल्याने त्यांचा हा अनुभव देखील क्षणात अनेक लोकांपर्यंत पोहोचला. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मी AI Chatbot ला विचारलं की, “तमिळनाडूमध्ये का गुंतवणूक करावी?” यावर मला नक्कीच काही चांगली उत्तरं मिळाली.”

Open AI Chatbot बद्दल काय म्हणाले महिंद्रा? (Anand Mahindra On ChatGPT)

आनंद महिंद्रा यांनी गुंतवणुकीबाबत केलेल्या प्रश्नावर AI कडून त्यांना काही संबंधित माहिती मिळाली. AI च्या माहितीनुसार तमिळनाडूमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे, स्किल्ड वर्क फोर्स आहे तसेच पोर्ट एरिया देखील विकसित होत आहे. या परिसरात चांगले शिक्षण मिळत असून, इथे उत्तम प्रमाणात सरकारचा पाठिंबा मिळत आहे. अश्या बऱ्याच गोष्टी ChatGPTने सांगितल्या. आनंद महिंद्रा यांच्या मते, ChatGPTने दिलेल्या या माहितीवरून केवळ चांगलं भाषणच दिलं जाऊ शकतं, मात्र या माहितीला कुठल्याही प्रकारे मानवी अनुभवाची जोड मुळीच नाही. ChatGPT अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करते, पण तरीही त्याला कुठेही ह्यूमन टच दिला जात नाही. कुठल्याही गोष्टीला ह्यूमनटच असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

महिंद्रा यांनी तमिळनाडूमध्ये गेल्यावर्षी काही प्रकल्पांच्या घोषणा केल्या होत्या. तिथे कार्यरत असलेल्या चेंगलपट्टू मध्ये एक इलेक्ट्रिक वाहन बॅटरी चाचणी फॅसिलिटी कंपनीकडून उभारण्यात येईल असे ते म्हणाले होते. शिवाय इंडस्ट्रियल पार्कमध्ये महिंद्रा एसयूव्ही पार्किंग ट्रेक आणि सिपकोटमध्ये एक क्रॅश टेस्ट फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः आनंद महिंद्रा यांनी सादर केली होती.

महिंद्रा Open AI Chatbot बद्दलच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. जगभरात दिवसेंदिवस ChatGPTचा वापर वाढत असताना आनंद महिंद्रांनी मानवी अभावाचा केलेला उल्लेख सर्वांना वाढत्या तांत्रिक बदलांबद्दल विचार करायला भाग पडत आहे. ChatGPT मुळे जरी जीवन सोपं झालं असलं आणि वेळ वाचत असला तरीही मानवी स्वभावाची जोड नसेल तर या गोष्टी समजण्यास काही अंशी क्लिष्ट बनतील (Anand Mahindra On ChatGPT). महिंद्रा यांच्या विधानानंतर ही वाढती टेक्नॉलॉजी आपल्या फायद्याची आहे की माणसाचे माणूसपण काढून घेणारी आहे? याचा सखोल विचार करावा लागेल.