Anand Mahindra Viral Post : सोशल मीडिया एक कमालीचं मनोरंजनाचं साधन आहे. इथे मोठमोठाले उद्योगपती, कलाकार, खेळाडूंपासून सामान्य लोकांचा समावेश होतो. सामान्य जनता प्रसिद्ध लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधू शकते. इंटरनेटमुळे जग खूप छोटं झालंय आणि म्हणूच तुम्ही वेळेत एखाद्या व्यक्तीच्या कामावर प्रतिक्रिया नोंदवू शकता. अशी प्रतिक्रियांमुळे अनेकवेळा वाद विवाद झालेले देखील तुम्ही पहिले असतीलच, मात्र आता सध्या आनंद महिंद्रा आणि एका सोशल मीडिया वापरकर्त्यामध्ये एक विनोदी संभाषण झालेलं पाहायला मिळतंय. X म्हणजेच आधीच्या ट्विटरवर झालेल्या या संभाषणातून नेटकऱ्यांना मनसोक्त हसायची अजून एक संधी उपलब्ध झाली आहे. नेमकी काय आहे हि अनोखी पोस्ट, ज्यामुळे ट्विटरचे वापरकर्ते पोट धरून हसत आहेत जाणून घेऊया..
देशातील अरबपती आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एका वापरकर्त्याला मजेशीर उत्तर दिल्याने सर्वत्र या पोस्टची चर्चा सुरु आहे. खुले आम ट्विटरवर आनंद महिंद्रा यांच्याकडून एका वापरकर्त्याने पैश्यांची मागणी केली आहे. त्या वापरकर्त्याने एकूण 1 लाख रुपयांची मागणी केलेली असून तो हे पैसे कुठे वापरणार याबाद्दलही सविस्तर माहिती त्याने आनंद महिंद्रा यांना दिलीये. या अतरंगी मेसेजवर आनंद महिंद्रा यांनी दिलेलं उत्तर आणखीनच मजेदार असल्यामुळे याची सगळीकडे चर्चा केली जात आहे.
नेमकी हि अतरंगी पोस्ट आहे तरी काय? Anand Mahindra Viral Post
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर R@ R४1534672 या आयडीवरून एका वापरकर्त्याने थेट आनंद महिंद्रा यांना, “सर मला महिंद्रा कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी 1 लाख रुपयांची गरज आहे” असा मेसेज केला होता(Anand Mahindra Viral Post). या मेसेजवर आनंद महिंद्रा यांनी दिलेला रिप्ल्या सध्या चर्चेत आहे. या अतरंगी युजरला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणतात कि , “What An Idea Sir ji” पुढे त्यांनी वापरकर्त्याची पाठ थोपटली आणि विचारायला काय जातंय असं म्हणत त्याला कौतुकास्पद पण मजेशीर असं उत्तर दिलं. सध्या वायरल होणाऱ्या या पोस्टला 4 लाख पेक्षा अधिक लोकांचे व्युज मिळाले आहेत.
What an idea Sirji.
— anand mahindra (@anandmahindra) December 27, 2023
Aapki himmat ke liye Taaliyaan! Poochne mein kya jaata hai? 😀 https://t.co/respZDQXKl
देशातील बाकी प्रसिद्ध उद्योगपतींच्या तुलनेत आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सर्वात अधिक सक्रिय असतात. अनेक वेळा X चा वापर करून ते नेटकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडून मिळणारं मोटिव्हेशन प्रत्येकालाच हवं हवंस वाटतं आणि म्हणूनच त्यांचे फॉलोवर्स देखील अधिक आहेत. लोकांना आवडणारे आणि रुचणारे पोस्ट करत असल्यामुळे आनंद महिंद्रा याचे पोस्ट (Anand Mahindra Viral Post) इतरांच्या तुलनेत अधिक प्रमाणात शेअर केले जातात. सध्या त्यांचे 1 कोटी पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.