Anand Mahindra Viral Post : महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुप्स चे मालक म्हणजेच आनंद महिंद्रा हे नेहमीच तरुणाईच्या पसंतीस उतरतात. देशातील इतर उद्योगपतींच्या तुलनेत आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अधिक ऍक्टिव्ह असल्यामुळे तरुण पिढीशी त्यांचा सर्वाधिक संपर्क होत असतो. आजच्या टेक्निकल जगात तरुण पिढीशी संवाद साधायचा असेल तर सोशल मीडिया शिवाय चांगलं माध्यम नाही हे गणित कदाचित आनंद महिंद्रा यांना व्यवस्थित उमगलेलं आहे. तरुणांच्या मनात कायम घर करून राहण्यासाठी ते नेहमीच त्यांना भावणाऱ्या कल्पनांना दुजोरा देतात, तरुणांच्या कल्पना नेहमीच आनंद महिंद्रा यांच्याकडून विचारात घेतल्या जातात तसेच नवनवीन संकल्पनांवर चर्चा देखील करताना दिसणारे महिंद्रा अनेकांच्या आवडीचे बनले आहेत. इतर प्रसिद्ध कलाकार किंवा खेळाडू सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोवर्सरी संवाद साधत नाहीत. मात्र महिंद्रा कंपनीचे मालक हे वेळोवेळी आपल्या फॉलोवर्सच्या कमेंट्स वर रिप्लाय करताना दिसतात म्हणूनच इतरांच्या तुलनेत आनंद महिंद्रा यांचा सोशल मीडियावर फॉलोवर्सचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे.
आनंद महिंद्रा यांनी पुन्हा खेचलं नेटकऱ्यांचं लक्ष: (Anand Mahindra Viral Post)
बाकी उद्योगपतींच्या तुलनेत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहणारे आनंद महिंद्रा पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे मालक अनेक वेळा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज आणि व्हिडिओ शेअर करतात, तसेच आजूबाजूच्या मंडळींना काही सूचना देखील देताना दिसतात. आज जाणून घेऊया की आनंद महिंद्रांनी नेमकी कुणाला व काय सूचना केली आहे ज्यामुळे ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
काय आहे आनंद महिंद्रा यांचा व्हिडिओ?
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या व्हिडिओमध्ये दोन तरुण एका सोफ्यावर बसलेले आहेत. मात्र हा सोफा काही साधासुधा सोफा नाही. कारण, काही मिनिटांतच या सोफ्याचे गाडीमध्ये रूपांतर होताना दिसते. ही दोन मंडळी जेव्हा फेरफटका मारण्यासाठी बाहेर जातात तेव्हा आजूबाजूच्या रस्त्यावरील मंडळी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहताना दिसत आहेत (Anand Mahindra Viral Post)
आपली शक्कल लढवून व कौशल्याचा वापर करून एका सोफ्याचे रूपांतर वाहनांमध्ये करून दाखवलेल्या तरुणाचं आनंद महिंद्रा यांनी मन भरून कौतुक केलं आहे. त्या मुलांचे कौतुक करताना आनंद महिंद्रा सोशल मीडियावर लिहितात की “पहा त्यांची समर्पकता पहा… त्यांनी घेतलेले इंजीनियरिंगचे प्रयत्न पहा. देशाला जर का ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठं नाव कमवायचं असेल तर अशा पद्धतीच्या संशोधनांची भरपूर गरज आहे (Anand Mahindra Viral Post).
तरुणांचे कौतुक करून आनंद महिंद्रा इथेच थांबत नाहीत पुढे त्यांनी देशाच्या आरटीओ(RTO) विभागाला चॅलेंज केलं. अगदी सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या विनोद वृत्तीचा वापर करून ते पुढे म्हणतात की, “हा अविष्कार पाहून देशातील आरटीओ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल? व त्यांचे चेहरे कसे झाले असतील हे बघण्याची इच्छा माझ्या मनात तयार झाली आहे”. आनंद महिंद्रा यांचे मुळातच सर्वाधिक फॉलोवर्स असल्यामुळे हा व्हिडिओ देशभरात प्रचंड व्हायरल झाला. तसेच महिंद्रा यांचे फॉलोअर्स या दोन्ही मुलांचे भरभरून कौतुक करत आहेत.