Anant Ambani Father-in-Law: कोण आहेत अंबानींचे तिसरे व्याही? राधिका मर्चन्टच्या वडिलांचा व्यवसाय जाणून घ्या

Anant Ambani Father-in-Law: सध्या मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती यांच्या घरात पुन्हा एकदा लग्नसोहळ्याची धूमधाम पाहायला मिळतेय. त्यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी राधिका मर्चंट यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. याआधी, अनंत-राधिकाचा Pre-Wedding सोहळा 1 ते 3 मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आता सर्वांनाच उत्सुकता आहे की, अंबानींसोबत नातं जोडलेला मर्चन्ट परिवार आहे कोणाचा आणि राधिकाचे वडील विरेन मर्चंट कोणत्या व्यवसायात आहेत? चला तर मग जाणून घेऊया…

कोण आहेत वीरेन मर्चन्ट? (Anant Ambani Father-in-Law)

देशातील श्रीमंत लोकांमध्ये सुप्रसिद्ध असलेले वीरेन मर्चन्ट हे हेल्थकेअर कंपनी Encore चे CEO असून, त्यांच्या कंपनीची एकूण उलाढाल सुमारे 755 कोटी रुपयांच्या घरात असलेली बातमी समोर आली आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांच्याशी राधिकाच्या लग्नामुळे येत्या काळात अंबानी कुटुंबाचे तिसरे व्याही म्हणून सामील होतील. वीरेनची मुलगी राधिका ही केवळ एक यशस्वी नृत्यांगनाच नाही, तर ती तिच्या वडिलांच्या व्यवसायातही सक्रिय योगदान देते. हा विवाह वैयक्तिक संबंधांच्या पलीकडे जाऊन, दोन प्रभावशाली कुटुंबांची व्यावसायिक सहकार्याची शक्यता असलेली एक जवळीक दर्शवतो.

मुकेश अंबानी पुन्हा एकदा आघाडीवर:

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 104 अब्ज डॉलर इतकी झाली आहे(Anant Ambani Father-in-Law). या वाढत्या आकडेवारीमुळे ते जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यासोबतच, त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीजची बाजारी किंमत 20.36 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे जी आणखी एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.