Ananya Birla Success Story: असं म्हणतात कि स्वबळावर काही तरी नवीन करून दाखवण्याची इच्छा असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटांवर हसत हसत मात करू शकतो. मनात दृढ विश्वास जर का असेल कि, ‘जगातली कुठलीही ताकद मला माझे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही’ तर कुठलीही व्यक्ती सफल होऊ शकते. सफल होण्याची क्षमता हि प्रत्येकाजवळ आहे पण अनेकवेळा आपण स्वतःला, स्वतःच्या क्षमतेलाच ओळखू शकत नाही आणि इतरांशी तुलना करत कुढत बसतो. आपल्या देशात वंश परंपरेने चालत आलेल्या व्यावसायिकांची कमी नाही, आणि यातीलच एक महत्वाचं नाव म्हणजे बिर्ला घराणं. आज जाणून घेऊया बिरला घराण्यातल्या अनन्या बिर्ला एका मुलीची गोष्ट. अनन्या बिर्ला हि आज स्वतःची कंपनी चालवते, पण कसा होता तिचा प्रवास? जाणून घेऊया….
17 व्या वर्षी केली व्यवसायाची सुरुवात: (Ananya Birla Success Story)
कमोडीटी टायकून म्हणजेच कुमार मंगलम बिर्ला तुम्हाला माहितीच असतील. अनन्या बिर्ला हि त्यांचीच मुलगी आहे. पिढीजात व्यवसायाची जाण असलेल्या अनन्याने वयाच्या 17व्या वर्षीच या क्षेत्रात पदार्पण केलं, तिने स्वतःची Svatantra Microfin नावाची कंपनी सुरु केली होती. चैतन्य इंडिया फिन क्रेडीटचे संपादन (Acquisition) केल्यामुळे आता अनन्या बिर्ला हिची कंपनी नॉन-बँकिंग फायनान्समधले दुसरी सर्वात मोठे खेळाडू बनली आहे. या संपादनानंतर कंपनीची एकूण मालमत्ता 130 अब्ज रुपयांच्या पुढे पोहोचली आहे, आणि सध्या अनन्या बिर्ला हिच्या मार्गदर्शनाखाली Svatantra Microfin हि कंपनी पहिले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
अनन्या बिर्ला हिचे वडील कुमार बिर्ला हे बिर्ला घराण्यातील पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. कुमार बिर्ला यांच्या तीन मुलांपैकी अनन्या हि सर्वात मोठी मुलगी आहे, तिने जगप्रसिद्ध ओक्सफोर्ड विश्वविद्यालयातून इकोनोमिक्स आणि मेनेजमेंट या विभागातून पदवी मिळवली आहे (Ananya Birla Success Story). व्यवसाय सांभाळण्यासोबतच ती स्वतःची संगीताची आवड ही जपते, नोव्हेंबर 2017 मध्ये अनन्या बिर्ला हिने तिचं पाहिलं गाणं “लिवीन द लाईफ” जगासमोर आणलं होतं.
भारतात वाढतोय NBFC चा व्यवसाय:
मायक्रोफायनान्स इंडस्ट्री बॉडी MFIN इंडियाचे CEO आलोक मिश्रा म्हणतात कि स्वतंत्र मायक्रोफिनने सचिन बन्सल यांच्या कंपनीचे संपादन केल्यामुळे माय्रोफायनान्सच्या क्षेत्राला एक चांगली बातमी मिळाली आहे. स्वतंत्र मायक्रोफिन हि कंपनी त्यांचे सुशासन आणि जबाबदार कार्यासाठी ओळखली जाते. आणि आता या नवीन निर्णयामुळे हि कंपनी अजून मजबूत होणार आहे.
एप्रिल 2019 पर्यंत स्वतंत्र मायक्रोफिनच्या एकूण 280 शाखा होत्या ज्यांचे रुपांतर नोव्हेंबर 2023 पर्यंत 800 शाखांमध्ये झाले आहे (Ananya Birla Success Story). देशातील महिलांना मदत करण्यासाठी त्यांनी या कंपनीची सुरुवात केली होती, बँकिंग सुविधांपासून वंचित राहिलेल्या समाजाला मदत करणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि वर्ष 2018 मध्ये गृह निर्माण वित्तसेवा प्रदान करण्यासाठी त्यांनी 3 अब्ज रुपयांना मायक्रो हाउसिंग फायनान्स कोर्पोरेशन विकत घेतले होते.