Anupam Mittal Success Story: भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासू वैवाहिक संकेतस्थळ म्हणून Shaadi.com ने अनेक मनांचा मिलाप घडवून आणला आहे. योग्य जोडी शोधण्यासाठी ओळखली जाणारी ही एक प्रमुख matrimonial site आहे. लाखो लोकांनी आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी सहयोगी जोडी शोधण्यासाठी याचा विश्वासाने वापर केलेल्या गोष्टी त्यांच्या यशाची साक्ष देतात, आत्तापर्यंत जगभरातून 3.5 दशलक्षांहून अधिक लग्नांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
Shaadi.com ची सुरुवात कोणी केली? (Anupam Mittal Success Story)
1996 मध्ये अनुपम मित्तल यांनी लग्नाच्या जोडी शोधण्यासाठी एक नवीन कल्पना मांडली होती – Shaadi.com. त्यांचं ध्येय होतं, लोकांना जास्तीत जास्त जोडीदारांचे पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांचा अनुभव सुखद करणं. त्यामुळे त्यांनी ही ऑनलाईन सेवा सुरू केली. आज Shaadi.com हे जगभर प्रसिद्ध नाव बनलं आहे. अनेक लोकांचे जीवन या सेवेमुळे बदललंय, त्यांना आपल्या आयुष्याचा साथी सापडला आहे. आता Shaadi.com ही फक्त एक संकेतस्थळ न राहता, अनेक प्रेमांच्या कहाण्यांचं साक्षीदार बनलंय असंही आपण म्हणूच शकतो.
अनुपम मित्तल यांचं जीवन कसं होतं?
अनुपम मित्तल यांचा जन्म 23 डिसेंबर 1971 रोजी झाला, पुढे त्यांनी Operation and Statistic Management मध्ये MBA ची मोठी पदवी मिळविली. MBA पर्यंत शिक्षण पूर्ण करून करून चांगली नोकरी करत असतानाच, मित्तल यांना इंटरनेटचं वाढतं महत्त्व जाणवलं आणि 1996 मध्ये त्यांनी नोकरी सोडून भारतात परत येऊन ‘People Group’ नावाची पहिली कंपनी सुरू केली.
टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट क्षेत्रातील कंपनी म्हणून ‘People Group’ला काहीसंच यश मिळालं, पण ते आश्चर्यकारक नव्हतं. कारण तेव्हा भारतात बहुतेकांक लोकांना इंटरनेटचा वापर माहिती नव्हता. मित्तल इंटरनेटवर आधारित व्यवसायाच्या अनेक कल्पनांचा विचार करत असतानाच त्याची आई त्याच्या लग्नाची जुळणी करू पाहत होती, म्हणजेच एका बाजूला इंटरनेटच्या जगाची क्रांती करण्याचं स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला लग्नाची चर्चा अशी कहाणी सुरु होती.
याच दरम्यान मित्तल यांच्या डोक्यात लोकांना त्यांचा परिपूर्ण जोडीदार शोधण्यासाठी Online कंपनी सुरु करण्याची संकल्पना आली. या कल्पनेतूनच ‘Shaagai.com’ या वेबसाइटचा जन्म झाला, जी पुढे जाऊन ‘Shaadi.com’ बनली. टिंडर किंवा फेसबुकच्या आधीच, जगातलील पहिली matchmaking Site सुरू करणारे ते अनुपम मित्तल होते(Anupam Mittal Success Story). आता, त्यांच्या या लग्नसंबंधी उपक्रमामुळे Shaadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांची संपत्ती 200 कोटी रुपयांच्या वर गेली आहे आणि कदाचित तुम्ही आज त्यांना शार्क टॅंक इंडियामध्ये देखील पाहिलं असेल.