Ashneer Grover Case : ग्रोव्हर दांपत्याला दाखवला घरचा रस्ता, नेमकं प्रकरण काय?

Ashneer Grover Case : Sony TV वर लागणाऱ्या शार्क टेंक इंडियामध्ये तुम्ही अश्नीर ग्रोव्हर हे नाव ऐकलं असेलच, याच प्रसिद्ध उद्योगपतीच्या पाठी लागलेली संकटे काही संपण्याचे नाव घेत नाही आहेत. सोशल मीडियाद्वारे तुम्हाला कळलंच असेल कि ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीला विमानतळावर अडवण्यात आलं होतं. न्यूयॉर्कला चालेल्या या जोडप्याला रोखण्यात आलं आणि म्हणूनच अश्नीर ग्रोव्हर यांनी सोशल मिडीयाचा वापर करून त्यांचा राग व्यक्त केला आहे. अश्नीर ग्रोव्हर यांच्या विरोधात 81 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आणि सदर प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे ते सध्या सतत चर्चेत असतात…

ग्रोव्हर दांपत्याला घरी पाठवले : (Ashneer Grover Case)

न्यूयॉर्कसाठी निघालेल्या अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना दिल्ली विमानतळावरून सुरक्षा तपासणी करताना घरचा रस्ता दाखवण्यात आला. सध्या अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर 81 कोटी रुपयांची हेराफिरी केल्याचा आरोप लागला आहे आणि सदर प्रकरणाची तपासणी सुरु असून आता त्यांच्या नावे लुकआउट सर्कुलर जारी करण्यात आल्यामुळे ग्रोव्हर दांपत्याला विमानतळावरून घरी परतण्याचा आदेश देण्यात आला होता.

घडलेल्या प्रकारामुळे अश्नीर ग्रोव्हर भडकले असून त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करून आपला राग व्यक्त केला आहे. X म्हणजेच ट्वीटरचा वापर करत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover Case) यांनी केला आहे, आणि आपण चालेल्या तपासात संपूर्ण सहकार्य करणार आहोत असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. आता पुढच्या आठवड्यात या दांपत्याला ईओडब्ल्यू ऑफ‍िसमध्ये प्रश्नांची उत्तरे दयायला उपस्थित राहावे लागणार आहे.