सरकारची जबरदस्त योजना!! म्हातारपणी पैशाची चिंताच सोडा; ‘या’ ठिकाणी करा गुंतवणूक

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यात पैशाची अडचण भासू नये म्हणून आपण वेगेवेगळ्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करत असतो. आयुष्याच्या उतारवयात पैशासाठी कोणापुढे हात पसरायला लागू नये हाच यामागील मुख्य हेतू असतो. रिटायर्मेंट नंतर पुढे काय असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. जर एकटा कमवता व्यक्ती असेल तर वृद्धापकाळात पैसा कसा येणार? कोण आणणार, घर कसं चालणार हा प्रश्न पडतो. या वर तोडगा म्हणून केंद्र सरकार अनेक पेन्शन योजना राबवत आहे. ज्यामध्ये तुम्ही बेफिकीरपणे गुंतवणूक करू शकतात आणि रिटायरमेंट नंतर काय हा प्रश्न सुद्धा यामुळे संपू शकतो .

सरकारच्या बऱ्याच पेन्शन योजना आहे. त्यापैकी एक असलेली अटल पेन्शन योजना खूप प्रसिद्ध आहे. ही अटल पेन्शन योजना 2015-16 या कालावधीत लोकांना गुंतवणुकीचे सर्वात उत्तम पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने सुरु केली होती. ही योजना सुरू करण्यासाठीचा सर्वात मोठा फायदा हा होता की, जे लोक कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाही त्यांना गुंतवणुकीची संधी मिळावी. या संधीचा लाभ घेऊन बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केली.

त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये लागू करण्यात आलेल्या नियमानुसार ज्या व्यक्ती वर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी प्रत्येकजण त्यात गुंतवणूक करण्यास पात्र होता. या पेन्शन योजने अंतर्गत गुंतवणूक करून म्हातारपणात दर महिन्याला १००० ते 5,000 रुपये पेन्शन तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला यासाठी फक्त प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवणूक करावी लागते.

काय आहेत अटल पेन्शन योजनेचे फायदे

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास, दरमहा 210 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल.

जर तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन हवी असेल तर 42 रुपये, भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

याचबरोबर ६० वर्षानंतर 2000 रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला 84 रुपये, 3000 रुपये पेन्शन साठी 126 रुपये, 4000 रुपये पेन्शनसाठी तुम्हाला 168 रुपयांची गुंवतणूक करावी लागेल.

शक्यतो या योजनेत तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा तुमचा फायदा अधिक होईल. या योजनेची गुंतवणूक रक्कम तुम्ही हवी तेवढी वाढवू शकता आणि कमीही करू शकता

सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा एखाद्या गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला तर ही योजना गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देत राहील.

अटल पेन्शन योजनेसाठी काय आहे पात्रता

या अटल पेन्शन योजनेसाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

या पेन्शन योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

आधार कार्ड सोबत बँक खाते जोडलेले हवे.

अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक.

आधीच अटल पेन्शनचा लाभार्थी नसावा.

कमीत कमी वीस वर्षे पेन्शन साठी पैसे भरावे लागतील.