Atal Pension Yojana : फक्त 210 रुपयांची गुंतवणूक करून दर महिन्याला मिळवा 5000 रूपये पेन्शन

Atal Pension Yojana | आपण आयुष्यभर मेहनत घेतो, का? तर म्हातारपण सोपं जावं म्हणून. अनेक गुंतवणुका करतो, उतार वयात हेच साठवलेले पैसे आपल्या कामी याव्यात यासाठी. सरकारकडून सुद्धा वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला जातो. एकंदरीत काय तर आपण जे काही कमावतो त्याची बचत करू पाहतो. उतारवयात आर्थिक संकटाना तोंड द्यावं लागू नये, पैशासाठी कोणासमोर हात पसरायला लागू नये यासाठी हा सर्व खटाटोप असतो. आणि सरकार सुद्धा गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतो. आज आपण अश्याच एका सरकारी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये महिन्याला फक्त 210 रूपये गुंतवणूक करून तुम्ही उतारवयात दर महिना 5000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता. अटल पेन्शन योजना असे या योजनेचे नाव असून ही योजना आपल्याला नक्कीच म्हातारपणी मदत करेल.

काय आहे अटल पेन्शन योजना? (Atal Pension Yojana)

अटल पेन्शन योजना ही भारत सरकार द्वारे राबवली जाते. ह्या योजनेचा मुळ उद्देश हा वृद्ध माणसांना आर्थिक मदत करणे असा आहे. वयाच्या साठाव्या वर्षानंतर एक सुखी आयुष्य जगता यावं म्हणून या योजनेची सुरुवात केली गेली. उतरवयात काम करण्याची ताकद कमी झाल्याने आधी सारखी मेहनत करणा सोपं नसतं, अश्यावेळी या आर्थिक मदत देणाऱ्या योजना कामी येतात.

या योजने (Atal Pension Yojana) अंतर्गत दर महिन्याला तुम्हाला काही रक्कम जमा करावी लागते, जी नंतर pension च्या रूपाने तुम्हाला दिली जाते. वर्ष २०१५-२०१६ मध्ये या योजनेची सुरुवात करण्या आली होती. कर्मचार्यांना निवृत्ती नंतर आर्थिक मदत मिळत राहावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेला APY म्हणून ओळखलं जातं.

अटल पेन्शन योजनेचा फायदा काय ?

वयाची साठी पार केलेल्या कार्माच्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना काम करते. अशी अनेक लोक आहेत ज्यांचा निवृत्ती नंतर आर्थिक स्त्रोत कायमचा बंद होतो. अश्या लोकांना देखील या योजने अंतर्गत गुंतवणूक करता येते. इथे गुंतवणूक करून तुम्ही स्वतःसाठी नियमित पैशांची सोय करू शकता. या योजनेचे फायदे लक्षात घेत पाच कोटी पेक्षा जास्ती लोकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. वृद्धकाळ हा आराम करण्याचा वेळ असतो. अश्यावेळी मिळणारी पेन्शन हाच मोठा आर्थिक आधार ठरतो.

अटल पेन्शन योजनेच्या अटी कोणत्या ?

या मध्ये गुंतवणुकीची वयोमर्यादा १८ ते ४० वर्ष अशी आहे. या व्यतिरिक्त तुम्ही भारतीय नागरिक असणे भाग आहे. या योजनेचा (Atal Pension Yojana) लाभ मिळवण्यासाठी किमान वीस वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अर्ज करताना तुमचे bank account तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असेल. या सोबतच मोबाईल नंबर द्यावा . निवृत्तीनंतर तुम्ही 1000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला काही रक्कम जमा करावी लागेल. उदाहरणार्थ दर महिन्याला तुम्हाला ५,००० रुपये पेन्शन हवी असेल तर या योजनेत तुम्हाला दर महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

१ ऑक्टोबर २०२२ पासून इथे एक नवीन नियम जोडण्यात आला , कर भरणाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही मात्र अटल पेन्शन योजनेचा भाग असलेल्या रहिवाश्यांना आयकरातून सुट देण्यात आली आहे.