Atul Bedekar Death: बेडेकर मसाल्याचे संचालक अतुल बेडेकर यांचे वयाच्या 56 व्या वर्षी निधन

Atul Bedekar Death : मराठी जेवण हे मसाल्यांशिवाय अपूर्ण आहे, आणि महाराष्ट्रात बेडेकरांचे मसाले हे सर्वाधिक प्रसिध्द आणि चविष्ट आहे. पण या कंपनीसाठी एक दुःखाची बातमी समोर आली आहे, कारण कंपनीचे संचालक अतुल बेडेकर हे निधन पावले आहेत. कंपनीचा आधारस्तंभ कोलमडून पडल्यामुळे चारही बाजूनी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निधन झाले तेव्हा बेडेकर हे केवळ 56 वर्षांचे होते आणि कर्करोगाशी लढा देताना त्यांना देवाज्ञा झाली.

बेडेकर मसाल्यांचा आधारस्तंभ हरवला: Atul Bedekar Death

बेडेकर मसाले या प्रसिद्ध मसाला कंपनीचे संचालक अतुल बेडेकर यांचे आज निधन झाले आहे. अतुल बेडेकर हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते आणि शेवटी आज त्यांना ईश्वर आज्ञा (Atul Bedekar Death) झाली आहे. बेडेकर यांच्यावर आज दुपारी दक्षिण मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बेडेकर हा लोणचे आणि मसाल्यांचा ब्रँड आहे जो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो मात्र याची सुरुवात श्री. व्ही. पी. बेडेकर यांनीही सध्या किरणा दुकानापासून केली होती. जसजसा काळ उलटला तशी व्यवसायाची जबाबदारी त्यांनी आपले सुपुत्र अण्णासाहेब बेडेकर यांच्या खांद्यावर सोपवली आणि यानंतर 1921 पासून त्यांनी आपली लोणची आणि मसाले बनवण्यास सुरुवात केली.

आज बेडेकर आपल्या ग्राहकांनाच आपली खरी संपत्ती मानतात. आजपर्यंत त्यांनी ग्राहकांना नेहमीच प्राधान्य दिले आहे, ग्राहकांची इच्छा आणि आवड जोपासत आपल्या व्यवसायात बदल केले आहेत. त्यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर आपल्या ग्राहकांसोबत एक घनिष्ठ नाते निर्माण केले आहे. ग्राहकांनाच ते आपली खरी कमाई मानतात आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.