रिझर्व बँकेने Axis Bank आणि Manappuram Finance ला ठोठावला लाखोंचा दंड; काय आहे कारण?

बिझनेसनामा ऑनलाईन । आपल्या देशातील सर्वोच्य बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया… या बँककडून दिलेले सर्व आदेश व नियम हे इतर बँकांसाठी बंधनकारक असतात आणि कुणीही यांचे उल्लंघन करू शकत नाहीत. जसे एखाद्या राज्यात मुख्यमंत्र्याचा आदेश किंवा देशात प्रधानमन्त्र्याचा आदेश अंतिम मानला जात्तो तसेच देशात रिझर्व बँकचा शब्द हा सर्व बँक आणि बँकांच्या ग्राहकांनी पालन करणे अनिवार्य आहे. रिझर्व बँक झालेल्या गुन्ह्यासाठी इतर बँकांना शिक्षा देऊ शकते आणि आज अशीच एक शिक्षा एक्सिस बँक आणि मनप्पुराम फायनान्स (Axis Bank and Manappuram Finance) यांच्या नवे ठोठावण्यात आली आहे. काय आहे यांचा गुन्हा आणि नेमकी किती मोठी शिक्षा सुन्यावण्यात आली आहे हे जाणून घेऊया…

रिझर्व बँकने दिली एक्सिस बँक आणि मनप्पुराम फायनान्सला शिक्षा:

वरती म्हटल्या प्रमाणे रिझर्व बँक हि देशातील सर्वोच्य बँक आहे आणि या बँक कडून देण्यात आलेले आदेश मान्य करणे हे प्रत्येकासाठी अनिवार्य असते. आज रिझर्व बँक कडून काही बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एक्सिस बँक आणि मनप्पुराम फायनान्स यांच्या नावे एक दंड जारी केला आहे. दंड जारी करण्याआधी बँक आणि वित्तीय संस्थेला त्यांनी केलेल्या उल्लंघनाबद्दल करणे द्या नोटीस पाठवण्यात आली होती आणि संपूर्ण कारणे तपासून झाल्यानंतर आता एक्सिस बँकला 90.92 लाख रुपये तर मनप्पुराम फायनान्सच्या नवे 42.78 लाख रुपयांचा दंड जारी करण्यात आला आहे.

का ठोठावला दंड? (Axis Bank and Manappuram Finance)

एक्सिस बँक आणि गोल्ड लोन देणारी प्रसिद्ध संस्था मनप्पुराम फायनान्स यांनी भारतीय रिझर्व बँक मार्गदर्शक तत्त्वे 2016 ‘कर्ज आणि अग्रिम – वैधानिक आणि इतर निर्बंध’ याच्या अंतर्गत ‘जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मार्गदर्शक तत्वांमधील निर्देशांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. मात्र एवढा मोठा दंड आकारण्याआधी रिझर्व बँक कडून दोन्ही संस्थांना या कृत्याबद्दल कारणे विचारण्यात आली होती, यानंतर झालेल्या चर्चा सत्रात दोन्ही संस्थांचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यांना हा दंड देण्यात आला आहे.