Axis Bank Credit Card :आपल्या आजूबाजूची परिस्थिती किती वेगाने बदलत आहे, जुन्या काळात आपण वस्तूच्या बदल्यात वस्तू विकत घ्यायचो. त्यानंतर पैश्यांच्या रुपात देवाण घेवाण सुरु झाली आणि मग आले क्रेडीट आणि डेबिट कार्ड, आता तर आपण थेट मोबाईलचा वापर करून पैसे पाठवतो. तुम्ही क्रेडीट कार्डवर असलेला नंबर पहिलाच असेल, मात्र कधी नंबर नसलेलं क्रेडीट कार्ड पाहिलं आहे का? हो! असंही क्रेडीट कार्ड मिळवणं सोपं आहे कारण Axis Bank घेऊन आली आहे देशातील सर्वात पाहिलं नंबरलेस क्रेडीट कार्ड. हे कसं हाताळावं आणि काय आहेत त्याचे फायदे पाहूयात…
एक्सिस बँकचं नंबरलेस क्रेडीट कार्ड: Axis Bank Credit Card
Axis Bank कडून बाजारात येणारं हे सगळ्यात पहिलं नंबर नसलेलं क्रेडीट कार्ड असणार आहे. (Axis Bank Credit Card ). हे कार्ड बाजारात आणण्यासाठी बँकने फिन्टेक फायीब (Fintech Fibe) यांच्याशी करार केलेला आहे. नंबरलेस क्रेडीट कार्ड म्हणजे काय तर यावर कोणतीही एक्सपायरीची तारीख नसते, किंवा CVV नंबर छापलेला नसतो. यावर त्या कार्डच्या वापरकर्त्याची कोणत्याही प्रकारची ओळख दाखवली जाणार नाही. आणि यावर कोणतेही नंबर किंवा माहिती नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने याचा वापर करणे सोयीस्कर आहे. ग्राहकाची गोपनीयता यामुळे अबाधित राहते.
या कार्डचे फायदे किती?
या कार्डचा वापर तुम्ही इतर कोणत्याही क्रेडीट कार्ड प्रमाणे करू शकता. या कार्डचा वापर करून सर्व प्रकारच्या हॉटेल्समधून ऑनलाईन फूड मागवल्यानंतर तुम्हाला 3% कॅशबेक मिळणार आहे. जर का तुम्ही कोणतेही राइड एप्स वापरत असाल तर त्यावरही पुन्हा एकदा 3% कॅशबेक उपलब्ध आहे. हा 3% कॅशबेक पुढेही कॅन्टीन्यू होतो आणि ऑनलाईन तिकिटांवर सुद्धा हि सवलत मिळते. याशिवाय सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवहारांवर 1% कॅशबेक मिळतो. रूपे (Rupay)चा वापर करून तुम्ही हे क्रेडीट कार्ड UPIशी जोडू शकता, तसेच ग्राहकांसाठी इथे Tap And Pay चा पर्याय देखील आहे.
Axis Bank Credit Card कार्ड कुठे वापरावं?
तुम्ही Fibe App चा वापर करून या कार्डची मागणी करू शकता. Rupay वर सुरु करण्यात येणारी हि सुविधा वापरून तुम्ही UPIचा वापर करू शकता. डिजिटली तर याचा वापर जवळजवळ सगळीचकडे होईल, मात्र जी दुकानं ऑनलाइन पैसे स्वीकारतात तिथे जाऊन सुद्धा कार्डचा वापर शक्य आहे. या कार्डवरील वार्षिक शुल्क शून्य रुपये असणार आहे, Fibe चे 21 लाखांपेक्षा अधिक ग्राहक या कार्डचा वापर करू शकतात.