Ayodhya Deepotsav : घरबसल्या व्हा Ayodhya Deepotsav मध्ये सहभागी; एका दिव्यासाठी 101 रुपये खर्च

Ayodhya Deepotsav : दरवर्षी अयोध्येची दिवाळी सगळीकडे प्रसिद्ध असते. अयोध्येत होणारी असंख्य दिव्यांची दिवाळी हि आत्तापर्यंत देशात सर्वांचे लक्ष वेधून घेते, यावर्षी दिवाळीची उत्सुकता अधिक असणार आहे कारण आहे तिथे बनणारं श्रीरामाचं मंदिर. पण तुम्हाला माहिती आहे का अयोध्येच्या या भव्य दिव्य दिवाळीचा तुम्ही देखील एक भाग बनू शकता. योगी सरकार दरवर्षीपेक्षा यंदाची दिवाळी अजून जल्लोषात साजरी करण्याच्या तयारीत आहे, आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही 21 लाख रुपयांचा आपला रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या मार्गावर आहे.

तुम्ही कसे बनाल याचा भाग : (Ayodhya Deepotsav)

दरवर्षी प्रमाणे अयोध्या 21 लाख दिव्यांची भव्य दिव्य दिवाळी साजरी करण्यासाठी तयार आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे अयोध्या जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाकडून या वर्षी एक नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे घर बसल्या तुम्ही अयोध्याच्या दिवाळीचा भाग बनू शकता. घर बसल्या या उपक्रमात तुम्ही एक नाही तर 51 दिव्यांसाठी पैसे देणगी म्हणून देऊ शकता. एका दिव्यासाठी तुम्ही 101 रुपये दान करू शकता तर 11 दिव्यांसाठी 251 रुपये दान करावे लागतील. 21 दिव्यांसाठी 501 रुपये तर 51 दिव्यांसाठी 1100 रुपये देणगी म्हणून द्यावे लागतील.

कसे कराल बुकिंग:

पर्यटन विभागातर्फे यासाठी एक एप तयार करण्यात आला आहे, ज्याला होली अयोध्या असे नाव देण्यात आले आहे. या एपचा वापर करून तुम्ही घर बसल्या अयोध्येच्या दिवाळीचा (Ayodhya Deepotsav) भाग बनू शकता. हा एप डाउनलोड करून तुमचं नाव व इतर महत्वाची माहिती त्यात समाविष्ट करावी तसेच तुम्ही किती दिव्यांची देणगी देऊ इच्छिता तो आकडा द्यावा. याच्या बदल्यात जो पत्ता तुम्ही देऊ केला आहे त्यावर तुम्हाला प्रसाद पाठवला जाईल, केवळ देशातीलच नाही तर विदेशातून भक्तगण यात सहभागी होऊ शकतात.